सांगली हादरली! वाढदिवसादिवशीच दलित महासंघाच्या नेत्याला संपवलं, जमवाच्या मारहाणीत खून करणाऱ्याची हत्या!
सांगलीत काल दुहेरी हत्याकांड झाल्याची मोठी बातमी समोर आली आहे. या घटनेत दलित महासंघाचे राज्य अध्यक्ष उत्तम मोहिते यांचा निर्घृण खून करण्यात आल्याची माहिती आहे.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
वाढदिवसादिवशीच दलित महासंघाच्या नेत्याला संपवलं
जमवाच्या मारहाणीत खून करणाऱ्याची हत्या!
सांगलीत मुळशी पॅटर्न स्टाइल हत्याकांड
Sangali Crime: सांगलीत काल दुहेरी हत्याकांड झाल्याची मोठी बातमी समोर आली आहे. या घटनेत दलित महासंघाचे राज्य अध्यक्ष उत्तम मोहिते यांचा निर्घृण खून करण्यात आल्याची माहिती आहे. सांगलीच्या गारपीर चौकात उत्तम मोहिते यांचा वाढदिवस साजरा करत असतानाच त्यांच्यावर सपासप वार करून हत्या करण्यात आली. तसेच, उत्तम मोहिते यांच्यावर वार करणाऱ्या शाहरुख शेख उर्फ शेऱ्या नावाचा तरुणाचा सुद्धा यावेळी जमावाने केलेल्या मारहाणीत मृत्यू झाल्याचं सांगितलं जात आहे.
बर्थडे पार्टीचं आयोजन
संबंधित घटनेमुळे परिसरात तणावाचं वातावरण निर्माण झालं आहे. आता या प्रकरणासंदर्भात विश्रामबाग आणि सांगली पोलीस पुढील तपास करत असल्याची माहिती आहे. दलित महासंघाचे अध्यक्ष उत्तम मोहिते यांचा काल म्हणजेच मंगळवारी वाढदिवस होता. त्यांचा वाढदिवस साजरा करण्यासाठी गारपारी चौकात पार्टीचं आयोजन करण्यात आलं होतं. शहरातील बरेच मान्यवर वाढदिवसांच्या कार्यक्रमासाठी उपस्थित राहिले होते. त्यावेळी, आरोपी शाहरुख शेख उर्फ शेऱ्या सुद्धा त्याच्या साथीदारांसोबत त्या कार्यक्रमात गेला होता.
हे ही वाचा: Delhi Blast: सुप्रसिद्ध बॉलीवूड अभिनेत्रीने कार स्फोटात गमावली जवळची व्यक्ती! म्हणाली, "माझ्या कुटुंबाचा भाग..."
शुभेच्या देण्याच्या बहाण्याने जवळ जाऊन हल्ला...
वाढदिवसाचा कार्यक्रम सुरू झाला आणि सर्वांनी आधी जेवण केलं. जेवण झाल्यानंतर, सर्वजण उत्तम मोहिते यांना शुभेच्छा देण्यासाठी त्यांच्याजवळ जात होते. दरम्यान, आरोपी शाहरुख शेख उर्फ शेऱ्या सुद्धा त्याच्या आठ ते दहा साथीदारांसह वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्याच्या बहाण्याने उत्तम मोहिते यांच्या जवळ गेले. त्यावेळी, आरोपींनी त्यांच्याकडे असलेली धारदार हत्यारे बाहेर काढली आणि त्यांच्यातील एका गुप्तीने उत्तम मोहिते यांच्या पोटात आणि मानेवर धारदार शस्त्राने वार करण्यात आले. इतकेच नव्हे तर, त्यांच्यावर तलवारीने सुद्धा वार करण्यात आले.
हे ही वाचा: Personal Finance: PPF मधून जास्तीत जास्त पैसा तर ‘हा’ Golden Rule अजिबात नका विसरू!
बेदम मारहाणीत हल्लेखोराचा सुद्धा मृत्यू
या हल्ल्यात उत्तम मोहिते गंभीररित्या जखमी झाले. शरीरातून प्रचंड रक्तस्त्राव होत असल्याने ते खाली कोसळले. दरम्यान, काकांवर झालेल्या हल्ल्यामुळे उत्तम मोहिते यांचा पुतण्या संतापला आणि त्यानंतर, त्याने उत्तम मोहिते यांच्यावर हल्ला करणाऱ्या आरोपी शाहरुख शेख याच्यावर धारदार हत्याराने हल्ला केला. नंतर, उत्तम मोहिते यांच्या समर्थकांनी सुद्धा आरोपीला बेदम मारहाण केली आणि या मारहाणीत हल्लेखोर शाहरुख शेख याचा मृत्यू झाला. या घटनेबाबत चौकशी केली असता, उत्तम मोहिते यांच्यावर हल्ला करणारे हल्लेखोर ड्रग्सच्या नशेत असल्याची माहिती स्थानिकांकडून मिळाली.










