Personal Finance: PPF मधून जास्तीत जास्त पैसा तर ‘हा’ Golden Rule अजिबात नका विसरू!
PPF Golden Rule- PPF ही एक उत्कृष्ट बचत योजना आहे. जर तुम्हाला PPF मधून जास्तीत जास्त परतावा हवा असेल तर तुम्ही "पाचवा नियम" पाळला पाहिजे.
ADVERTISEMENT

Personal Finance Tips for PPF Golden Rule: सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी (PPF) ही भारतातील एक लोकप्रिय गुंतवणूक योजना आहे. लोक वर्षानुवर्षे PPF मध्ये गुंतवणूक करतात, परंतु बहुतेकांना जास्त व्याजदर देणाऱ्या एका विशेष नियमाची माहिती नसते. त्याला "पाचवा नियम" म्हणतात. या सुवर्ण नियमाचे पालन करून या सरकारी योजनेत गुंतवणूक करणारे इतरांपेक्षा जास्त व्याजदर मिळवतात. हा नियम नेमका काय आणि तो कसा काम करतो याबद्दल जाणून घ्या.
PPF मध्ये का टाकावेत 5 तारखेच्या आत पैसे?
PPF मध्ये जमा होणारे मासिक व्याज महिन्याच्या 5 तारखेला तुमच्या खात्यातील शिल्लक रकमेवर आधारित ठरवले जाते. याचा अर्थ असा की जर तुम्ही 5 तारखेपूर्वी पैसे जमा केले तर तुम्हाला संपूर्ण महिन्याचे व्याज मिळेल. जर तुम्ही 5 तारखेनंतर पैसे जमा केले तर तुम्ही त्या महिन्याचे व्याज गमावता... म्हणजे नुकसान. जर तुम्ही दरमहा पीपीएफमध्ये 10-12 हजार रुपये जमा करता. पण ही रक्कम 5 तारखेनंतर जमा केली तर त्या महिन्याचे व्याज कमी होते. आणि जर हे 15 वर्षे चालू राहिले तर तुमचे किमान 1 लाख रुपयांपेक्षा जास्त नुकसान होऊ शकते.
कुठे चुकतात लोक?
बहुतेक लोक 10, 15 तारखेला किंवा पगार मिळाल्यावर पैसे जमा करतात. त्यांना वाटते की पैसे जमा होत आहेत आणि त्यांना व्याज मिळेल. परंतु PPF प्रणाली वेगळी आहे. जर वेळ चुकीची असेल तर दरमहा व्याजातून थोडीशी रक्कम कापली जाते.
PPF ही भारत सरकारद्वारे चालवली जाणारी दीर्घकालीन बचत योजना आहे. तुम्ही दरवर्षी किमान 500 रुपये ते जास्तीत जास्त 1.5 लाख रुपये गुंतवू शकता. त्याचा लॉक-इन कालावधी 15 वर्षे आहे, म्हणजेच तुम्ही या कालावधीनंतरच संपूर्ण रक्कम काढू शकता.










