मोठी बातमी : भाजप आमदार चित्रा वाघ यांच्याविरोधात शिरूर-कासार न्यायालयाकडून वॉरंट जारी, नेमकं प्रकरण काय?
Maharashtra Politics : मोठी बातमी : भाजप आमदार चित्रा वाघ यांच्याविरोधात शिरूर-कासार न्यायालयाकडून वॉरंट जारी, नेमकं प्रकरण काय? जाणून घेऊयात..
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
मोठी बातमी : भाजप आमदार चित्रा वाघ यांच्या अडचणी वाढल्या
शिरूर-कासार न्यायालयाकडून वॉरंट जारी
बीड : राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) चे युवक प्रदेशाध्यक्ष महेबुब शेख यांनी दाखल केलेल्या अब्रूनुकसानीच्या दाव्यात भाजप नेत्या चित्रा वाघ यांच्या अडचणी वाढल्या आहेत. शिरूर कासार न्यायालयाने चित्रा वाघ यांच्याविरोधात वॉरंट जारी केले आहे. याबाबतची माहिती महेबुब शेख यांचे वकील अंकुश कांबळे यांनी दिली आहे.
हेही वाचा : शरद पवारांच्या राष्ट्रवादीला दिलासा, केंद्रीय निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय; 'ती' मागणी अखेर मान्य
या प्रकरणात चित्रा वाघ यांनी महेबुब शेख यांच्याबाबत बदनामीकारक वक्तव्य केल्याचा आरोप आहे. त्यानंतर शेख यांनी न्यायालयात अब्रूनुकसानीचा दावा दाखल केला होता. या प्रकरणात न्यायालयाकडून वारंवार समन्स पाठवूनही वाघ हजर झाल्या नाहीत. त्यामुळे न्यायालयाने आज त्यांच्याविरोधात वॉरंट काढण्याचा निर्णय घेतला आहे, अशी माहिती महेबुब शेख यांचे वकील ॲड. अंकुश कांबळे यांनी दिली.
भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) चे युवक प्रदेशाध्यक्ष यांच्यावर तरुणीचा छळ केल्याचे आरोप केले होते. वादाची सुरुवात चित्रा वाघ यांनी महेबुब शेख यांच्याबाबत केलेल्या कथित बदनामीकारक वक्तव्यांमुळे झाली. शेख यांनी या वक्तव्यांमुळे आपली प्रतिमा आणि अब्रू धुळीस मिळाल्याचा आरोप करत शिरूर कासार न्यायालयात अब्रूनुकसानीचा दावा दाखल केला होता. या प्रकरणात न्यायालयाने चित्रा वाघ यांना वारंवार समन्स पाठवूनही त्या हजर झाल्या नव्हत्या. अखेर आज न्यायालयाने त्यांच्याविरोधात वॉरंट जारी केले आहे. या संदर्भात महेबुब शेख यांचे वकील ॲड. अंकुश कांबळे यांनी माहिती दिली. त्यांनी सांगितले की, “न्यायालयाने अनेक वेळा समन्स पाठवले, मात्र चित्रा वाघ यांनी प्रतिसाद दिला नाही. त्यामुळे न्यायालयाने पुढील प्रक्रिया म्हणून वॉरंट जारी केले आहे.”










