पुण्यात खळबळ! इंदापुरात आढळला पुरुषाच्या पायाचा गुडघ्यापासून तोडलेला भाग... पोलीसही चक्रावले
इंदापूरमध्ये वाहतुकीच्या रस्त्यावर गुडघ्यापासून खालील पायाचा भाग आढळून आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
इंदापूरमध्ये आढळला पुरुषाच्या पायाचा तोडलेल्या अवस्थेतील भाग....
गुडघ्यापासून खालील पायाचा भाग आढळून आल्याने खळबळ...
पुण्यातील धक्कादायक घटना
Pune Crime: पुण्यातील इंदापूरमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. येथील कळंब निमसाखर मार्गावर कळंब गावच्या हद्दीत एका हॉटेलपासून 500 ते 700 मीटर अंतरावर माणसाच्या डाव्या पायाचा अर्धा भाग आढळून आला. गुडघ्यापासून खालील पायाचा भाग तोडलेल्या अवस्थेत आढळून आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. संबंधित घटना ही काल म्हणजेच 12 नोव्हेंबर रोजी सकाळच्या सुमारास घडली. इंदापूरच्या वालचंदनगर पोलीस ठाण्यातील अधिकारी आता या प्रकरणाचा अधिक तपास करत असल्याची माहिती आहे.
पायाचा भाग पुरुष जातीचा...
या भयानक घटनेची माहिती वालचंदनगर पोलीस स्टेशनमध्ये देण्यात आली. माहिती मिळताच पोलीस ठाण्याचे प्रभारी पोलीस निरीक्षक राजकुमार डुणगे हे घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी घटनास्थळावर तपास सुरू केला. मिळालेल्या माहितीनुसार, हा पायाचा भाग पुरुष जातीचा असून तो डाव्या बाजूच्या पायाचा आहे.
हे ही वाचा: माधुरीनंतर महाराष्ट्रातील आणखी एक हत्ती वनतारामध्ये जाणार, कोल्हापूर सर्किट बेंचचा मोठा निर्णय
पोलीस अधिकारी घटनास्थळी पोहोचले अन्...
पुरुषाच्या डाव्या बाजूच्या पायाचा गुडघ्यापासून खालील भाग पडलेला होता. त्यामुळे तिथल्या स्थानिकांमध्ये एकच खळबळ उडाली आहे. पोलिसांना तातडीने माहिती मिळताच वालचंदनगर पोलीस ठाण्याचे प्रभारी पोलीस निरीक्षक राजकुमार डुणगे घटनास्थळावर दाखल झाल्यानंतर, घटनास्थळाचा तपास करण्यात आला. आता, पोलीस अधिकारी या धक्कादायक प्रकरणाचा पुढील तपास करत असल्याचं सांगितलं जात आहे.
हे ही वाचा: डोंबिवली हादरली.. बारजवळ फक्त धक्का लागला म्हणून 6 जणांनी मिळून आकाशचा केला Murder, जागीच संपवलं
पायाची ओळख पटवण्यासाठी पोलिसांचा तपास
पोलिसांच्या माहितीनुसार, पायाच्या गुडघ्यापासून खालील भागात पांढरा सॉक्स सुद्धा आढळून आला. आता, पोलीस हा पायाचा भाग नेमका कोणत्या पुरुषाचा आहे? याची ओळख पटवण्यासाठी सर्वत्र शोध घेण्यास सुरूवात केली आहे. या प्रकरणाबाबत माहिती मिळाल्यानंतर, बारामती विभागाच्या फॉरेन्सिक लॅबचे कर्मचारी देखील घटनास्थळी दाखल झाले होते. तसेच, इंदापूरचे पोलीस निरीक्षक विलास नाळे यांनीही घटनास्थळी भेट दिली आणि नेमकं प्रकरण जाणून घेण्याचा प्रयत्न केला.










