माधुरीनंतर महाराष्ट्रातील आणखी एक हत्ती वनतारामध्ये जाणार, कोल्हापूर सर्किट बेंचचा मोठा निर्णय

मुंबई तक

Omkar elephant will be released into Vantara : माधुरीनंतर महाराष्ट्रातील आणखी एक हत्ती वनतारामध्ये जाणार, कोल्हापूर सर्किट बेंचचा मोठा निर्णय

ADVERTISEMENT

Omkar elephant will be released into Vantara
Omkar elephant will be released into Vantara
social share
google news

बातम्या हायलाइट

point

माधुरीनंतर महाराष्ट्रातील आणखी एक हत्ती वनतारामध्ये जाणार

point

कोल्हापूर सर्किट बेंचचा मोठा निर्णय

Omkar elephant will be released into Vantara, कोल्हापूर : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ‘ओंकार’ या जंगली हत्तीला काही काळासाठी गुजरातमधील वनतारा प्राणी संगोपन केंद्रात हलविण्याचा आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर खंडपीठाने बुधवारी (दि. 12) दिला. तसेच पुढील कार्यवाहीसाठी उच्चस्तरीय समिती गठित करण्याचे निर्देशही न्यायमूर्ती मकरंद कर्णिक आणि अजित कडेठाणकर यांनी दिले. या संदर्भात दाखल करण्यात आलेली जनहित याचिका कायम ठेवण्यात येणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले, अशी माहिती अॅड. उदय वाडकर आणि अॅड. केदार लाड यांनी दिली.

गेल्या काही महिन्यांपासून सिंधुदुर्गातील ओंकार हत्तीला वनतारा केंद्रात हलविण्याची प्रक्रिया सुरू होती. याला विरोध दर्शवत रोहित कांबळे यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्किट बेंचमध्ये महाराष्ट्र सरकार आणि वनविभागाविरोधात जनहित याचिका दाखल केली होती. न्यायमूर्ती कर्णिक आणि कडेठाणकर यांच्या खंडपीठासमोर या प्रकरणाची सुनावणी सुरू आहे. सिंधुदुर्गमधील दोडामार्ग हा हत्तींचा नैसर्गिक अधिवास असल्याने, अधिवास बदलल्यास ओंकारच्या जीवनासाठी धोका निर्माण होऊ शकतो, अशी युक्ती याचिकाकर्त्यांच्या वकिलांनी मांडली.

हेही वाचा : तुळजापूरः Drugs प्रकरणातील आरोपीचा चक्क भाजपमध्ये प्रवेश, राणा पाटलांच्या खेळीने फडणवीसांची अडचण; सुप्रिया सुळेंनी तर थेट...

नागपूरच्या मुख्य वनसंरक्षकांच्या अहवालानुसार, एखादा हत्ती एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी हलवता येऊ शकतो. दोडामार्ग परिसरात मानवी वस्तीत वारंवार प्रवेश करणाऱ्या ‘ओंकार’ या हत्तीला पकडून गुजरातमधील ‘वनतारा’ प्राणी संगोपन केंद्रात पाठविण्याची प्रक्रिया सुरू होती. मात्र, या निर्णयाला प्रा. रोहित कांबळे यांनी विरोध दर्शवून जनहित याचिका दाखल केली होती.

हे वाचलं का?

    follow whatsapp