कारेगावच्या सरपंच मॅडम पुन्हा निवडणुकीच्या मैदानात उतरणार, कुठून लढणार? दिलीप वळसे पाटलांकडे मोठी मागणी

मुंबई तक

Karegaon Sarpanch Nirmala Shubham Nawale contest the election : कारेगावच्या सरपंच मॅडम पुन्हा निवडणुकीच्या मैदानात उतरणार, कुठून लढणार? वळसे पाटलांकडे मोठी मागणी

ADVERTISEMENT

_nawale Nirmala Shubham Nawale
_nawale Nirmala Shubham Nawale
social share
google news

बातम्या हायलाइट

point

कारेगावच्या सरपंच मॅडम पुन्हा निवडणुकीच्या मैदानात उतरणार,

point

कुठून लढणार? दिलीप वळसे पाटलांकडे मोठी मागणी

Karegaon Sarpanch Nirmala Shubham Nawale contest the election : कारेगावच्या माजी सरपंच आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या नेत्या निर्मला नवले (Nirmala Shubham Nawale) पुन्हा एकदा निवडणुकीच्या मैदानात उतरणार आहेत. निर्मला नवले यांनी कारेगाव कान्हूर मेसाई पंचायत समिती गणातून निवडणूक लढण्यास तयारी सुरु केली आहे. शिवाय माजी मंत्री दिलीप वळसे पाटील (Dilip Walase Patil) यांनी उमेदवारी द्यावी, अशी मागणी देखील त्यांच्याकडून करण्यात आली आहे.इन्स्टाग्राम पोस्टच्या माध्यमातून नवले यांनी निवडणुकीच्या मैदानात उतरण्याचा इरादा बोलून दाखवलाय. 

हेही वाचा : मुलीचं कपड्यांवरुन ट्रोलिंग, इंदुरीकर महाराज भावूक, 2 दिवसांत कीर्तन क्षेत्र सोडण्याचा निर्णय घेणार; पाहा VIDEO

पंचायत समितीच्या निवडणूक लढवण्यासाठी निर्मला नवले इच्छुक 

निर्मला नवले (Nirmala Shubham Nawale) यांनी इन्स्टाग्राम पोस्टवर लिहिले की, राजकारण आणि समाजकारणाचा नवा अध्याय! आपल्या कारेगाव कान्हूरमेसाई गटाच्या विकासासाठी आणि जनतेच्या सेवेसाठी मी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने पंचायत समिती निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे. मा. गृहमंत्री दिलीपरावजी वळसे पाटील साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली पक्षाची अधिकृत उमेदवारी मिळेल, याचा मला पूर्ण विश्वास आहे. आपला विश्वास, माझा निर्धार! आता फक्त विकास!

हे वाचलं का?

    follow whatsapp