मुंबई: 22 मुलींवर लैंगिक अत्याचार... पण एकही पुरावा सापडला नाही, क्रूर आरोपीची कहाणी ऐकून शिसारी येईल

मुंबई तक

सीरियल सेक्स ऑफेंडर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या रेहान कुरेशी या आरोपीला अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याच्या आरोपातून निर्दोष मुक्त करण्यात आल्याची बातमी समोर आली आहे.

ADVERTISEMENT

पण, 'त्या' प्रकरणात आरोपीची निर्दोश मुक्तता...
पण, 'त्या' प्रकरणात आरोपीची निर्दोश मुक्तता...
social share
google news

बातम्या हायलाइट

point

22 मुलींवर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप!

point

सीरियल सेक्स ऑफेंडरबद्दल जाणून थक्क व्हाल

Mumbai Crime: मुंबईतील विशेष पोक्सो न्यायालयाकडून सीरियल सेक्स ऑफेंडर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या रेहान कुरेशी या आरोपीला अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याच्या आरोपातून निर्दोष मुक्त करण्यात आल्याची बातमी समोर आली आहे. न्यायालयाने संबंधित प्रकरणातील पीडितेला भरपाई देण्याची शिफारस केल्याची माहिती आहे. आरोपी रेहान कुरेशीविरुद्ध असे 22 गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. त्यापैकी तीन प्रकरणांत त्याची निर्दोष मुक्तता झाली असून 19 खटले अजूनही प्रलंबित असल्याचं सांगितलं जात आहे. 

आरोपीची रेहान कुरैशी म्हणून ओळख 

ही संपूर्ण घटना 6 जून 2017 रोजी घडली. एका लांब दाढी असलेल्या पुरूषाने पीडित अल्पवयीन मुलीला तिच्या आईने ऑनलाइन अॅपवरून गीझर मागवलं असून ते तिला देण्याचे आमिष दाखवल्याचा आरोप करण्यात आला आहे. त्यानंतर आरोपी तिला इमारतींमध्ये घेऊन गेला आणि छताच्या जिन्यावर अल्पवयीन पीडितेवर लैंगिक अत्याचार केला. संबंधित आरोपीची रेहान कुरैशी म्हणून ओळख पटवण्यात आली. त्यानंतर, एका दुसऱ्या प्रकरणात जेल बंद असलेल्या रेहानला तुरुंगातूनच अटक करण्यात आली. 

हे ही वाचा: Govt Job: कोणत्याही परीक्षेशिवाय मिळवा सरकारी बँकेत नोकरी! इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकमध्ये मोठ्या पदांसाठी भरती...

आरोपी रेहान कुरेशी असल्याचं सिद्ध झालं नाही

या प्रकरणासंदर्भात, मुंबईच्या विशेष पोक्सो न्यायाधीश नीता एस. अनेकर यांनी त्यांच्या 31 पानांच्या निकालात म्हटलं की, "पीडितेवर लैंगिक अत्याचार झाल्याचं स्पष्ट आहे, परंतु तो आरोपी रेहान कुरेशी असल्याचं सिद्ध होऊ शकलं नाही." न्यायालयाने याबाबत सांगितलं की पीडित मुलीचं म्हणणं पूर्णपणे विश्वासार्ह होते. तिने जे भोगले ते सत्य आहे. मात्र, ओळख परेड (Identification Parade)दरम्यान चूक झाली. म्हणजेच, आरोपी रेहानविरुद्ध काहीच पुरावा नसल्याने त्याची निर्दोश मुक्तता करण्यात आलं. 

हे ही वाचा: मुंबईतून गावी आली अन् हातोडीने वार करून पतीचा खून! मृतदेह ट्रॉली बॅगेत भरला अन् मुलीला म्हणाली, "तुझ्या पप्पांना..."

पीडितेला भरपाई देण्याची शिफारस 

पोलिसांनी रेहानला आधीच एका दुसऱ्या एका प्रकरणात अटक केली होती आणि या प्रकरणाबाबत तुरुंगातच त्याची ओळख परेड केली. खरं तर, 2017 मध्ये, पीडितेने आरोपीला फक्त काही मिनिटे पाहिलं असल्याचं समोर आलं. ओळख परेड बऱ्याच महिन्यांनंतर झाल्याने पीडितेने आरोपीला ओळखणं कठीण होतं. न्यायाधीशांनी सांगितलं की, "पीडितेसोबत ही घटना घडलीच, पण यामध्ये रेहान आरोपी असल्याचं सिद्ध होऊ शकलं नाही. अशा परिस्थितीत त्याला Benefit of Doubt द्यावा लागेल." या व्यतिरिक्त, न्यायालयाने प्रकरणातील पीडितेला भरपाई देण्याची शिफारस केल्याची माहिती आहे. 

हे वाचलं का?

    follow whatsapp