शेतात आढळला महिलेचा नग्न अवस्थेत मृतदेह! भयानक दृश्य पाहून गावकऱ्यांना बसला धक्का...
सकाळच्या सुमारास शेतात एका महिलेचा नग्न अवस्थेत मृतदेह आढळला. त्या ठिकाणी येणाऱ्या-जाणाऱ्या लोकांना हे भयानक आणि विचित्र चित्र दिसल्यानंतर मोठा धक्का बसला.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
शेतात आढळला महिलेचा नग्न अवस्थेत मृतदेह!
भयानक दृश्य पाहून गावकऱ्यांना बसला धक्का...
Crime News: उत्तर प्रदेशातील हमीरपूर जिल्ह्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. येथील रमना गावात सकाळच्या सुमारास शेतात एका महिलेचा नग्न अवस्थेत मृतदेह आढळला. त्या ठिकाणी येणाऱ्या-जाणाऱ्या लोकांना हे भयानक आणि विचित्र चित्र दिसल्यानंतर मोठा धक्का बसला. मृत महिलेच्या शरीरावर एकही कापड नव्हतं.
पोलिसांनी घटनास्थळी केला तपास...
अशा अवस्थेतील मृतदेह नेमकं कोणत्या महिलेचा आहे? याबाबत आधी गावकऱ्यांमध्ये चर्चा झाली. खून झालेल्या महिलेचं नाव काय होतं? ती कोण होती? याबाबत चर्चा सुरू असतानाच पोलिसांना फोन करण्यात आला आणि या भयानक घटनेबाबत माहिती देण्यात आली. प्रकरणाची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले. त्यांच्यासोबत फॉरेन्सिक विभागाची टीमसुद्धा होती. घटनास्थळी पोहोचल्यानंतर, पोलिसांनी महिलेचा मृतदेह ताब्यात घेतला आणि प्रकरणाचा तपास सुरू केला.
हे ही वाचा: मुंबईची खबर: 'लाडकी बहीण योजने'साठी ई-केवायसी आवश्यक! ठाणे जिल्ह्यातील महिलांसाठी महत्त्वाची अपडेट
महिलेचं वय 35 वर्षे असल्याचा अंदाज
ज्या महिलेचा नग्न अवस्थेत मृतदेह आढळला, तिचं वय जवळपास 35 वर्षे असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. मात्र, अद्याप याबाबत माहिती समोर आली नाही. तसेच, ती महिला नेमकी कोण होती? याचा सुद्धा पोलीस तपास करत आहेत. खरं तर, अशा अवस्थेत मृतदेह आढळल्याने सामूहिक बलात्कार झाल्यानंतर महिलेची हत्या करण्यात आल्याचा प्राथमिक संशय व्यक्त केला जात आहे. पोलिसांच्या मते, पोस्टमॉर्टम रिपोर्ट्स आल्यानंतरच महिलेच्या मृत्यूमागचं नेमकं कारण समोर येईल. घटनास्थळी पोहोचल्यानंतर, पोलिसांनी आसपासच्या गावांमध्ये महिलेची ओळख पटवण्याचा प्रयत्न सुरू केला आहे.
हे ही वाचा: मुंबई: 22 मुलींवर लैंगिक अत्याचार... पण एकही पुरावा सापडला नाही, क्रूर आरोपीची कहाणी ऐकून शिसारी येईल
फॉरेन्सिक टीमने घटनास्थळावरून पुरावे गोळा केल्याची माहिती आहे. घटनेचं गांभीर्य पाहता पोलीस आता वेगवेगळ्या बाजूंनी प्रकरणाचा तपास करत आहेत. या भयानक घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. आता गावकऱ्यांनी या प्रकरणातील आरोपीला लवकरात लवकर अटक करून त्याच्यावर कठोर करवाई करण्यात यावी, अशी पोलिसांकडे मागणी केली आहे.










