Ladaki Bahin Yojana: खूशखबर! ५ वर्षांपर्यंत टेन्शन घेऊच नका, पैशांनी भरणार 'इतक्या' महिलांचं खातं

मुंबई तक

Ladaki Bahin Yojana Latest News: महाराष्ट्र सरकारने रक्षाबंधनाच्या उत्सवाआधीच राज्यातील कोट्यावधी महिलांना जबरदस्त गिफ्ट दिलं आहे. महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी सरकारकडून प्रत्येक महिन्याला महिलांच्या खात्यात १५०० रुपये जमा करण्याच्या योजनेची घोषणा करण्यात आली आहे. या योजनेच्या माध्यमातून पात्र महिलांना पुढील ५ वर्षापर्यंत लाभ मिळणार आहे.

ADVERTISEMENT

ladaki Bahin Yojana Latest Upda
ladaki Bahin Yojana Latest Upda
social share
google news

बातम्या हायलाइट

point

'या' महिलांना प्रत्येक महिन्याला मिळणार पैसे

point

३१ ऑगस्टपर्यंत योजनेसाठी करू शकता अर्ज

point

'या' महिलांच्या खात्यात जमा झाले पैसे

Ladaki Bahin Yojana Latest News: महाराष्ट्र सरकारने रक्षाबंधनाच्या उत्सवाआधीच राज्यातील कोट्यावधी महिलांना जबरदस्त गिफ्ट दिलं आहे. महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी सरकारकडून प्रत्येक महिन्याला महिलांच्या खात्यात १५०० रुपये जमा करण्याच्या योजनेची घोषणा करण्यात आली आहे. या योजनेच्या माध्यमातून पात्र महिलांना पुढील ५ वर्षापर्यंत लाभ मिळणार आहे. (To empower women financially, the government has announced a scheme to deposit Rs 1,500 in women's accounts every month. Eligible women will get benefits through this scheme for the next 5 years)

या महिलांना प्रत्येक महिन्याला मिळणार पैसे

राज्य सरकारने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरु केलीय. या योजनेच्या माध्यमातून सरकार लाभार्थी महिलांच्या खात्यात प्रत्येक महिन्याला १५०० रुपये जमा करणार आहे. ज्या महिलांच वय २१ ते ६५ वर्षांमध्ये आहे आणि वार्षिक उत्पन्न अडीच लाखांहून कमी आहे, अशा महिलांना या योजनेचा लाभ मिळणार आहे. ज्या महिला आर्थिक दृष्ट्या कमकुवत आहे, त्या महिलांना सक्षम करण्याचं काम या योजनेच्या माध्यमातून केलं जात आहे. या योजनेचा लाभ पुढील पाच वर्ष मिळणार आहे.

३१ ऑगस्टपर्यंत योजनेसाठी करू शकता अर्ज

महाराष्ट्र सरकारच्या या योजनेमुळं जवळपास दीड कोटी महिलांना थेट फायदा होईल, अशी आशा आहे. हिंदूस्थान टाईम्सच्या एका रिपोर्टनुसार, योजनेचा लाभ मिळवण्यासाठी बुधवारी बुधवारी १४ ऑगस्टपर्यंत १.६९ कोटी अर्ज जमा झाले होते. या अर्जांची छाननी केल्यानंतर जवळपास १.३६ कोटी अर्ज वैध्य ठरवण्यात आले आहेत. सरकारने योजनेसाठी अर्ज करण्याची तारीख ३१ ऑगस्टपर्यंत वाढवली आहे. त्यामुळे भविष्यात लाभार्थ्यांची संख्या वाढू शकते.

हे ही वाचा >> Badlapur News: "ती संस्था RSS आणि भाजपची..." नाना पटोलेंचा भाजपवर खळबळजनक आरोप

हे वाचलं का?

    follow whatsapp