कोरोनामुक्त गाव स्पर्धेची घोषणा, पाहा किती लाखांचं बक्षीस मिळणार
मुंबई: राज्यातील ग्रामीण भागातील कोरोनामुक्तीच्या (Corona free) कामाला प्रोत्साहन मिळावे व गावे (villages) लवकरात लवकर कोरोनामुक्त होऊन त्याद्वारे तालुका, जिल्हा आणि संपूर्ण महाराष्ट्र राज्य लवकरात लवकर कोरोनामुक्त व्हावे यासाठी राज्यात कोरोनामुक्त गाव स्पर्धा घेण्यात येत असल्याची घोषणा ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ (Hasan Mushrif) यांनी आज (2 जून) मुंबईत केली. राज्य मंत्रिमंडळाची बैठक (cabinet meeting) पार […]
ADVERTISEMENT

मुंबई: राज्यातील ग्रामीण भागातील कोरोनामुक्तीच्या (Corona free) कामाला प्रोत्साहन मिळावे व गावे (villages) लवकरात लवकर कोरोनामुक्त होऊन त्याद्वारे तालुका, जिल्हा आणि संपूर्ण महाराष्ट्र राज्य लवकरात लवकर कोरोनामुक्त व्हावे यासाठी राज्यात कोरोनामुक्त गाव स्पर्धा घेण्यात येत असल्याची घोषणा ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ (Hasan Mushrif) यांनी आज (2 जून) मुंबईत केली. राज्य मंत्रिमंडळाची बैठक (cabinet meeting) पार पडल्यानंतर याबाबतचा निर्णय घेण्यात आला.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी तीन दिवसांपूर्वी राज्यातील जनतेशी संवाद साधला होता. यावेळी त्यांनी म्हटलं होतं की, गावच्या वेशीवरच कोरोनाला रोखण्यात यावं. तसंच ज्या गावांनी कोरोनाचा शिरकाव आपल्या गावात होऊ दिला नव्हता त्यांचा देखील गौरव केला होता. त्या दृष्टीने आता या उपक्रमास अधिक चालना देण्यासाठी राज्य सरकारकडून स्पर्धेचे आयोजन करण्यात आलं आहे.
Corona मुक्त गाव! मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी केली नव्या मोहिमेची घोषणा
कोरोनामुक्त गावांना किती लाखांचं बक्षीस मिळणार?