सरकारने वारीच्या प्रस्तावाचा विचार करायला हवा होता,खडसेंचा राज्य सरकारला घरचा आहेर
सरकारने वारकऱ्यांच्या प्रस्तावाचा विचार करायला हवा होता असं म्हणत खडसेंनी आपली नाराजी बोलून दाखवली. मुक्ताईनगरमधून श्रीसंत मुक्ताबाईंची पालखी गेल्या अनेक वर्षांपासून पंढरपूरला जाते. पायी वारीत हजारो वारकरी सहभागी होतात. परंतू कोरोनामुळे गेल्या दोन वर्षांपासून पायी वारी बंद असून सरकारने पूरवलेल्या बसमधून पालख्यांना प्रवास होतो. आषाढीनिमीत्त विठ्ठलाचं दर्शन व्हावं अशी सर्व वारकऱ्यांची इच्छा असते. वारकरी संप्रदायाच्या […]
ADVERTISEMENT

सरकारने वारकऱ्यांच्या प्रस्तावाचा विचार करायला हवा होता असं म्हणत खडसेंनी आपली नाराजी बोलून दाखवली. मुक्ताईनगरमधून श्रीसंत मुक्ताबाईंची पालखी गेल्या अनेक वर्षांपासून पंढरपूरला जाते. पायी वारीत हजारो वारकरी सहभागी होतात. परंतू कोरोनामुळे गेल्या दोन वर्षांपासून पायी वारी बंद असून सरकारने पूरवलेल्या बसमधून पालख्यांना प्रवास होतो. आषाढीनिमीत्त विठ्ठलाचं दर्शन व्हावं अशी सर्व वारकऱ्यांची इच्छा असते. वारकरी संप्रदायाच्या माध्यमातून राज्य सरकारला अनेक प्रस्ताव पाठवण्यात आले होते. या प्रस्तावावर विचार झाला असता तर वारकऱ्यांना पांडुरंगाचं दर्शन घेता आलं असतं अशी खंत खडसेंनी बोलून दाखवली.
यंदा, देहू आणि आळंदी येथून सुरु होणाऱ्या पालखी प्रस्थान सोहळ्याला १०० तर इतर ८ पालखी प्रस्थान सोहळ्याला ५० जणांना उपस्थित राहण्याची परवानगी देण्यात आली आहे. प्रत्येक पालखीला यंदाही दोन बस देण्यात येणार असून सर्व नियमांचं पालन करुनच यंदाचा सोहळा आयोजित होईल असं अजित पवारांनी सांगितलं.
असा असेल यंदाचा पालखी सोहळा –
-
पालखी यंदाही बसमधूनच पंढरपूरला जाणार, ज्यासाठी शासन लवकरच अधिकृत आदेश जाहीर करेल