अशा वेळी शिवसेनेची बोटचेपी भूमिका का असते?; आशिष शेलारांचा सवाल

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

‘हिंदू सणांना परवानगी देण्‍याचा विषय आला की, ठाकरे सरकारच्‍या हाताला लकवा का मारतो?, शिवसेनेची बोटचेपी भूमिका का असते?,’ असा सवाल करीत भाजपा नेते आशिष शेलार यांनी आज पुन्‍हा एकदा ठाकरे सरकारवर तोफ डागली.

ADVERTISEMENT

हिंदू नववर्षानिमित्‍ताने गुढीपाडव्‍याला निघणाऱ्या शोभायात्रा आणि राम नवमीच्‍या मिरवणुकांना परवानगी द्या, अशी मागणी आमदार आशिष शेलार यांनी विधानसभेत केली होती. मात्र, अद्याप याबाबत सरकारकडून कोणत्‍याही स्‍पष्‍ट सूचना आलेल्‍या नाहीत. त्‍यामुळे आज माध्यमांशी बोलताना आमदार आशिष शेलार यांनी सरकारवर टीकेची झोड उठवली.

“ठाकरे सरकारने गुढीपाडव्‍या शोभायात्रा आणि राम नवमीच्‍या मिरवणुकींना परवानगी देण्‍याची भूमिका आजपर्यंत स्‍पष्‍ट केलेली नाही. त्‍यामुळे संभ्रमाचं वातावरण कायम आहे. ज्‍या ज्‍या वेळी हिंदू सणांचा विषय येतो, त्‍यावेळी ठाकरे सरकारच्‍या हाताला लकवा का मारतो?”, असं प्रश्न शेलार यांनी उपस्थित केला.

हे वाचलं का?

“मुंबई पोलिसांनी मुंबईत १० मार्च ते ८ एप्रिलपर्यंत जमावबंदीचे आदेश दिले आहेत. त्‍यासाठी आतंकवादी, देशविरोधी शक्‍ती या ड्रोन, रिमोट कंट्रोलचा वापर करून हल्‍ला करतील, अशी माहिती पोलीसांकडे आल्‍याचे ते सांगत आहेत.”

“अशी माहिती आली असेल, तर त्‍याबाबत सुरक्षा यंत्रणांनी खबरदारी जरुर घ्‍यावी. या कारणाने मुंबईत जमावबंदीचे कलम लावण्‍यात आले आहे. मात्र याच काळात गुढीपाडवा आणि राम नवमीचे कार्यक्रम येतात. म्‍हणून आमचा सरकारला सवाल आहे की, हिंदू सणांचा आणि रामभक्‍तांचा विषय आला की शिवसेनेची बोटचेपी भूमिका का असते?”, असं शेलार यांनी म्हटलं आहे.

ADVERTISEMENT

“संपुर्ण कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून या दोन्‍ही सणांना परवानगी देण्‍यात यावी. या कार्यक्रमात खोडा टाकू नये. आम्‍ही या मंडळ व समित्‍यांसोबत चर्चा करीत असून, या उत्‍सवात भाजपा सहभागी होईल, असं आशिष शेलार यांनी यावेळी सांगितलं.

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT