Gujarat Election Result 2022 : गुजरातमध्ये थेट शपथविधी सोहळ्याची तयारी, मुख्यमंत्री म्हणून कोण घेणार शपथ?

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

Gujarat Election Result 2022: गुजरात विधानसभा निवडणुकीचे (Gujarat Vidhansabha Election) निकाल आज जाहीर होत आहेत. या निवडणुकीत भाजपला प्रचंड मोठा विजय मिळत असल्याचं पाहायला मिळतं. तर काँग्रेसचं (Congress) अक्षरश: पानिपत होताना दिसत आहे. गुजरातमध्ये भाजपला 154 जागा मिळताना दिसत आहे. तर काँग्रेसला 19 आणि आम आदमी पक्षाला (AAP) 6 जागा मिळू शकतात. गुजरातमध्ये गेल्या वेळी भाजपने 99 जागा जिंकल्या होत्या. मात्र यंदाच्या निवडणुकीत भाजप आजवरचे सर्व रेकॉर्ड मोडण्याच्या तयारीत आहे.

ADVERTISEMENT

गुजरात विधानसभा निवडणूक निकाल UPDATE:

  • निकाल लागताच भाजपने तात्काळ शपथविधी सोहळ्याचा केला विचार, भूपेंद्र पटेल 10 किंवा 11 डिसेंबरला घेणार शपथ

हे वाचलं का?

  • सूत्रांच्या माहितीनुसार, दुपारी 12.39 वाजता शपथविधीसाठी शुभ वेळ आहे. त्यामुळे त्याच वेळेत शपथविधी होण्याची शक्यता आहे.

  • या दोन्ही तारखांसाठी पीएमओकडून पंतप्रधानांची वेळही मागण्यात आली आहे.

  • ADVERTISEMENT

  • या शपथविधी सोहळ्याला पंतप्रधान मोदी आणि गृहमंत्री अमित शहा आणि भाजपचे सर्व मुख्यमंत्री उपस्थित राहण्याची शक्यता आहे.

  • ADVERTISEMENT

  • गुजरातमध्ये भाजपचा विजय निश्चित.. भाजप गुजरात निवडणुकांमधील आजवरचे सर्व रेकॉर्ड काढणार मोडीत

  • गुजरातमध्ये भाजप 154 जागांवर आघाडीवर, तर काँग्रेस अवघ्या 19 जागांवर आघाडीवर

  • गुजरात विधानसभा निवडणुकीत भाजपची ऐतिहास विजयाच्या दिशेने वाटचाल

  • आतापर्यंत 182 जागांचे प्राथमिक कल समोर आले आहेत. ज्यामध्ये भाजप 149 जागांवर आघाडीवर तर काँग्रेस 23 जागांवर आघाडीवर आहे. तर आप 8 जागांवर पुढे आहे.

  • गुजरात विधानसभा निवडणूक निकालाचे कल आता हाती येऊ लागले आहेत. आतापर्यंत 155 जागांचे प्राथमिक कल समोर आले आहेत. ज्यामध्ये भाजप 102 जागांवर आघाडीवर आहे तर काँग्रेस 46 जागांवर आघाडीवर आहे. तर आप 7 जागांवर पुढे आहे.

  • गुजरातमध्ये दोन्ही टप्प्यात 182 जागांवर मतदान झाले आहे. 27 वर्षांपासून येथे भाजपचे सरकार आहे. Aaj Tak-Axis My India ने गुजरातमधील 42156 लोकांशी बोलून हा निष्कर्ष काढला आहे.

    या विधानसभा निकालाला आता अवघे काही तास उरले आहेत. मात्र यावेळीही भाजपच गुजरातमध्ये बाजी मारेल असा अंदाज सर्वत्र व्यक्त केला आहे. भाजपच्या अनेक नेत्यांनी असाही दावा केलाय की, गुजरातमध्ये भाजपला 150 जागा मिळतील. पण निकालात गुजरातच्या जनतेने कोणाला कौल दिलाय हे लवकरच स्पष्ट होईल. मात्र याआधी गुजरातमधील नेमकं राजकीय गणित काय हे आपण सविस्तर समजावून घेऊ.

    गुजरात EXIT POLL चा नेमका अर्थ काय.., ‘आप’ने काँग्रेसला लोळवलं?

    कोणत्या वर्गाने कोणत्या पक्षाला पसंती दिली

    • अनुसूचित जाती- 28% भाजप, 35% कॉंग्रेस, 30% AAP, 07% इतर

    • ST- 33% भाजप, 27% कॉंग्रेस, 31% AAP, 09% इतर

    • OBC- 57% भाजप, 22% कॉंग्रेस, 14% AAP, 07% इतर

    • ठाकोर – 47% भाजप, 29% काँग्रेस, 16% AAP, 08% इतर

    • कोळी – 49% भाजप, 24% काँग्रेस, 19% आप, 08% इतर

    • सवर्ण – 59% भाजप, 19% कॉंग्रेस, AAP 15%, 07% इतर

    • मुस्लिम – 08% भाजप, 54% कॉंग्रेस, 30% AAP, 08% इतर

    • लेवा पटेल – 56% भाजपा , 17% काँग्रेस, 18% AAP, 09% इतर

    • कडवा पटेल – 58% भाजप, 16% काँग्रेस, 20% AAP, 06% इतर

    • इतर पटेल – भाजप 53%, INC 21%, AAP 18%, 08% इतरांना पसंती दिली आहे.

    • भाजप – ग्रामीण भागात 45%, शहरी 48% मतदान

    • काँग्रेस – 27% ग्रामीण, 24% शहरी मतदान

    • AAP- ग्रामीण भागात 20%, शहरी भागात 21% मतदान

    • इतर- 08% ग्रामीण, 07% शहरी भागात मतदान

    • भाजप – 48% महिला, 44% पुरुष

    • काँग्रेस – 27% महिला, 25% पुरुष

    • AAP- 19% महिला, 21% पुरुष

    • इतर- 06% महिला, 10% पुरुषांनी मतदान केलं आहे.

    2012 मध्ये भाजपने 115, काँग्रेसने 61 आणि इतरांनी 6 जागा जिंकल्या होत्या. तर 2017 मध्ये भाजपने 99, काँग्रेसने 77+3 एपी, इतरांनी 3 जागा जिंकल्या होत्या.

    आम्ही उत्सव साजरा करणार नाही, आम्ही जनतेसाठी काम करू: हार्दिक पटेल

    विरमगाममधील भाजप उमेदवार हार्दिक पटेल म्हणाले की, ‘आम्ही सुरुवातीपासून म्हणत आहोत की, या वेगळ्या निवडणुका आहेत. भाजप मोठ्या मताधिक्याने विजयी होणार आहे. विरमगामसाठी खूप काम करण्याची गरज आहे. कोणीही विजय साजरा करणार नाही. 8 तारखेपासून गुजरातच्या जनतेसाठी काम सुरू करणार आहे. लोकांनी विश्वास दाखवला आहे आणि आम्हाला विश्वासावर जगायचे आहे.’

    हार्दिक पटेल पुढे म्हणाले, ‘मी भाजपचा सर्वात तरुण उमेदवार आहे. मी गेल्या 5 महिन्यात खूप मेहनत केली आहे. माझ्या विरमगामला गुजरातमधील सर्वोत्तम मॉडेल बनवायचे आहे. विरमगाममध्ये शासकीय योजना मार्गी लावण्यास माझे प्राधान्य असेल.’

    हार्दिक पटेल यांनी यावेळी काँग्रेसवरही जोरदार टीका केली आहे. ते म्हणाले, ‘गुजरातमध्ये निवडणुका होत आहेत आणि राहुल गांधी महाराष्ट्रात भारत जोडो यात्रा करत आहेत. थोडा राजकीय समज असायला हवी. एक व्यक्ती जो 17 वर्षापासून नेता बनू शकलेला नाही. त्याच्याकडून दुसरी काय अपेक्षा ठेवता येईल.’ असंही पटेल म्हणाले.

    ‘गुजरातच्या जनतेने काँग्रेसला विरोधी पक्षात बसवले, पण त्यांनी काहीच केले नाही. तरुण आंदोलक मुलांचा त्यांनी आपल्या फायद्यासाठी वापर केला. विरोधी पक्षात बसून त्यांनी काहीही केले नाही.’ असं हार्दिक पटेल म्हणाले.

    Poll of Polls: पाहा कोणत्या चॅनलचा काय आहे Exit Poll, गुजरात, हिमाचलमध्ये कोणाची सत्ता?

    गुजरात निवडणुकीत एकूण 788 उमेदवार

    गुजरातमध्ये पहिल्या टप्प्यात 89 जागांवर मतदान झाले. तर दुसऱ्या टप्प्यात आज 93 जागांवर मतदान झाले. गुजरातमध्ये 33 जिल्हे आहेत. पहिल्या टप्प्यात सौराष्ट्र-कच्छ आणि राज्याच्या दक्षिण भागातील 19 जिल्ह्यांतील 89 जागांवर मतदान झाले. सुमारे 63.31 टक्के मतदान झाले.

    पहिल्या टप्प्यात भाजप, काँग्रेस आणि आम आदमी पार्टी (आप) व्यतिरिक्त इतर 36 राजकीय पक्षांनी उमेदवार उभे केले. एकूण 788 उमेदवारांचे भवितव्य ईव्हीएममध्ये कैद झाले आहे. यामध्ये 339 अपक्षांचा समावेश आहे. भाजप आणि काँग्रेस सर्व 89 जागांवर लढत आहेत. तर 88 जागांसाठी आपचे उमेदवार रिंगणात आहेत. सुरत पूर्व मतदारसंघातील आपच्या उमेदवाराने आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला होता. इतर पक्षांपैकी BSP ने 57, BTP 14 आणि CPI(M) 4 उमेदवार उभे केले आहेत.

    दुसऱ्या टप्प्यात 93 जागांवर मतदान

    भाजप, काँग्रेस आणि आम आदमी पार्टी (आप) यांच्यासह 61 पक्षांचे 833 उमेदवार रिंगणात आहेत. तसेच 285 अपक्ष उमेदवार आहेत. भाजप आणि आप सर्व 93 जागांवर लढत आहेत. तर काँग्रेस 90 जागांवर निवडणूक लढवत आहे. काँग्रेसचा मित्रपक्ष राष्ट्रवादी काँग्रेसने दोन जागांवर उमेदवार उभे केले आहेत. तर भारतीय आदिवासी पक्षाने (BTP) 12 तर बहुजन समाज पक्षाने (BSP) 44 उमेदवार उभे केले आहेत. अहमदाबाद, बडोदा, गांधीनगर जिल्ह्यांतील 93 विधानसभा मतदारसंघांमध्ये मतदान झाले आहे.

    ‘गुजरात मॉडेल चार प्रकारच्या लोकांसाठी वाईट’, अशोक मोची मोदी-भाजपबद्दल काय बोलले?

    भाजपने पहिल्या टप्प्यात जिंकल्या 48 जागा

    2017 च्या निवडणुकीत पहिल्या टप्प्यात मतदान झालेल्या 89 पैकी 48 जागा भाजपने जिंकल्या होत्या. काँग्रेसने 40 जागा जिंकल्या होत्या, तर एक जागा अपक्ष उमेदवाराकडे होती. 2017 च्या विधानसभा निवडणुकीत सत्ताधारी भाजपने 93 पैकी 51 जागा जिंकल्या होत्या. काँग्रेसने 39 तर अपक्ष उमेदवारांना तीन जागा मिळाल्या होत्या. तर आम आदमी पक्षाच्या उमेदवारांची अनामत रक्कम जप्त झाली.

    मध्य गुजरातमध्ये भाजपला 37 तर काँग्रेसला 22 जागा मिळाल्या होत्या. पण उत्तर गुजरातमध्ये काँग्रेसचे वर्चस्व होते आणि त्यांनी 17 जागा जिंकल्या, तर भाजपला केवळ 14 जागा मिळाल्या.

    नाना पटोले : “गुजरात दंगलीवेळी अटलबिहारी वाजपेयींनीही मोदींना तीव्र शब्दात फटकारले होतं”

    पहिल्या टप्प्यातील ‘या’ आहेत व्हीआयपी जागा

    सौराष्ट्र विभागातील द्वारका जिल्ह्यातील खंभलिया मतदारसंघातून आपचे मुख्यमंत्री चेहरा इसुदान गढवी रिंगणात आहेत. आपचे प्रदेशाध्यक्ष गोपाल इटालिया हे सुरतमधील कटारगाममधून उमेदवार आहेत. क्रिकेटपटू रवींद्र जडेजाच्या पत्नी रिवाबा जडेजा जामनगर (उत्तर), गृहमंत्री हर्ष संघवी आणि सुरतमधील अन्य जागांवरून पूर्णेश मोदी आणि भावनगर (ग्रामीण) पाच वेळा आमदार पुरुषोत्तम सोलंकी यांच्या नावांचा समावेश आहे.

    गुजरात आपचे सरचिटणीस मनोज सोरठिया कारंजमधून, तर पाटीदार समाजाचे नेते अल्पेश कथिरिया सुरतमधील वराछा रोडमधून उमेदवार आहेत. सौराष्ट्रमध्ये ललित कगथरा, ललित वसोया, रुत्विक मकवाना आणि मोहम्मद जावेद पीरजादा या काँग्रेस आमदारांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. सातवेळा आमदार आणि ज्येष्ठ आदिवासी नेते छोटू वसावा हे भरूचमधील झगडिया येथून निवडणूक लढवत आहेत.

    दुसऱ्या टप्प्यातील ‘या’ आहेत लोकप्रिय जागा

    दुसऱ्या टप्प्यात अनेक लोकप्रिय जागा आहेत. यामध्ये मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांचा घाटलोडिया, पाटीदार नेता हार्दिक पटेल यांचा विरमगाम (दोन्ही अहमदाबाद जिल्ह्यातील), अल्पेश ठाकोर यांचा गांधीनगर दक्षिण, दलित नेते काँग्रेसचे जिग्नेश मेवाणी यांचा वडगाम (बनासकांठा जिल्हा), विधानसभेतील विरोधी पक्षनेते सुखराम राठवा यांचा जेतपुरडे यांचा समावेश आहे. याशिवाय भाजपचे बंडखोर मधू श्रीवास्तव हे वाघोडिया (जि. वडोदरा) येथून अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढवत आहेत.

    2017 विधानसभा निवडणुकीत काय होते निकाल?

    गुजरात विधानसभेचा कार्यकाळ पुढील वर्षी 18 फेब्रुवारी रोजी संपत आहे. 2017 च्या निवडणुकीत भाजपने गुजरात विधानसभेच्या 182 पैकी 99 जागा जिंकल्या होत्या. तर काँग्रेसला 77 जागा मिळाल्या होत्या. निवडणुकीनंतर भाजपने विजय रुपानी यांना मुख्यमंत्री केले. मात्र, सप्टेंबर 2021 मध्ये रुपानी यांच्या जागी भूपेंद्र पटेल यांना मुख्यमंत्री करण्यात आले. 2017 मध्ये गुजरातमध्ये 9 डिसेंबर ते 14 डिसेंबर दरम्यान मतदान झाले होते. तर 18 डिसेंबरला निकाल जाहीर झाला होता. गुजरात विधानसभेत बहुमतासाठी 92 जागा आवश्यक आहेत.

    ADVERTISEMENT

      follow whatsapp

      ADVERTISEMENT