गुजरातीबद्दल मला प्रेम, गुजराती-मराठी महाराष्ट्रात दुधात साखरेसारखे विरघळून गेले आहेत: CM
मुंबई: ‘मला गुजरातीबद्दल प्रेम नक्कीच आहे… गुजराती आणि मराठी महाराष्ट्रात दुधात साखरेसारखे विरघळून गेले आहेत.’ असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले आहेत. ‘मुंबई समाचार’ या वृत्तपत्राला 200 वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त मुंबईतील जिओ वर्ल्ड सेंटरमध्ये एका विशेष कार्यक्रम आज (14 जून) आयोजित करण्यात आला होता. ज्यासाठी स्वत: पंतप्रधान नरेंद्र मोदी हे हजर होते. याच कार्यक्रमात मुख्यमंत्री उद्धव […]
ADVERTISEMENT

मुंबई: ‘मला गुजरातीबद्दल प्रेम नक्कीच आहे… गुजराती आणि मराठी महाराष्ट्रात दुधात साखरेसारखे विरघळून गेले आहेत.’ असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले आहेत. ‘मुंबई समाचार’ या वृत्तपत्राला 200 वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त मुंबईतील जिओ वर्ल्ड सेंटरमध्ये एका विशेष कार्यक्रम आज (14 जून) आयोजित करण्यात आला होता. ज्यासाठी स्वत: पंतप्रधान नरेंद्र मोदी हे हजर होते.
याच कार्यक्रमात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपल्या भाषणात गुजराती जनता महाराष्ट्रात एकरुप झाली असल्याचं म्हटलं आहे. तसंच गुजरात आणि महाराष्ट्र.. गुजराती आणि मराठी… हे अधिकाधिक दृढ होत जावो असंही मुख्यमंत्री यावेळी म्हणाले.
पाहा मुंबई समाचारच्या भाषणात मुख्यमंत्री नेमकं काय म्हणाले:
‘मला गुजरातीबद्दल प्रेम नक्कीच आहे. मला गुजराती समजतं पण बोलू शकत नाही. आता मुंबई समाचार उद्यापासून सुरु करतो. नरेंद्र भाई मला खरंच विश्वास बसत नाहीए आजच्या कार्यक्रमाबद्दल. एका वृत्तपत्राला दोनशे वर्ष होतायेत.. दोनशे वर्ष.. मला अभिमान आहे, आनंद आहे की, आपल्या महाराष्ट्रात गुजराती वृत्तपत्र 200 वर्ष वाटचाल करतं याचा मला अभिमान आहे. आणि तुम्ही सगळे एवढ्या टाळ्या वाजवतायेत म्हणजे तुम्हाला मराठी येतंय. हेच तर आपलं नातं आहे. गुजराती आणि मराठी आपल्या महाराष्ट्रात दुधात साखरेसारखे विरघळून गेलेले आहेत.’ असं म्हणत मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी उपस्थितांची मनं जिंकली.