Viral Video: गुलाबी साडी अन् हाती साप, बाईई... काय प्रकार?
Gulabi Saree Women Shocking Video Viral : पावसाळ्यात थंड हवामान असल्यानं बहुतांश साप शरीराला उब मिळावी म्हणून घरात किंवा एखाद्या कारमध्ये लपून बसण्याचा प्रयत्न करतात. साप घरात घुसल्याचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.
ADVERTISEMENT
बातम्या हायलाइट
गुलाबी साडी नेसलेल्या महिलेचा थरारक व्हिडीओ होतोय व्हायरल
घरात घुसलेल्या सापाला महिलेनं पकडलं अन् तितक्यात...
महिलेनं पकडलेल्या सापाचा व्हिडीओ पाहून धडकीच भरेल
Gulabi Saree Women Shocking Video Viral : पावसाळ्यात थंड हवामान असल्यानं बहुतांश साप शरीराला उब मिळावी म्हणून घरात किंवा एखाद्या कारमध्ये लपून बसण्याचा प्रयत्न करतात. साप घरात घुसल्याचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. हे व्हिडीओ पाहिल्यानंतर अनेकांचा थरकाप उडतो. अशाचप्रकारचा धडकी भरवणारा व्हिडीओ इंटरनेटवर तुफान व्हायरल होत आहे. गुलाबी साडी नेसलेली महिला घरात घुसलेल्या सापाला बिंधास्तपणे हातात उचलते आणि त्यानंतर जे घडलं, ते पाहून तुम्हालाही आश्चर्याचा धक्का बसल्याशिवाय राहणार नाही.
महिलेनं घरात घुसलेल्या रॅट स्नेकला हातात पकडलं अन्...
इन्स्टाग्रामवर व्हायरल झालेल्या या व्हिडीओत पाहू शकता, गुलाबी रंगाची साडी नसलेली महिला घरात शिरलेल्या खतरनाक सापाला शोधते आणि त्याला बाहेर काढण्याचा प्रयत्न करते. कशाप्रकारे महिला सापाला हातात पकडून गावाच्या बाहेर नेण्याचा प्रयत्न करते, हे या व्हिडीओत पाहायला मिळत आहे. महिलेच्या हातात साप पाहून आजूबाजूला असलेल्या लोकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण होतं.
हे ही वाचा >> Ladki Bahin Yojana : माझी लाडकी बहीण योजनेचा आता नवीन फॉर्म, लगेच मिळणार 4500 रुपये?
परंतु, महिला अगदी सहजरित्या या सापाला पकडते आणि पोज देत जंगलाच्या दिशेनं जाते. त्यानंतर ती महिला या सापाला गवतात सोडून देते. महिला ज्या प्रकारे या सापाचा रेस्क्यू करते, ते पाहून अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. व्हिडीओ पाहिल्यानंतर काही नेटकऱ्यांनी महिलेच्या धाडसाचं कौतुक केलं आहे. तर काही लोकांनी महिलेच्या सौंदर्यावर प्रतिक्रिया दिल्या आहेत.
हे वाचलं का?
ADVERTISEMENT
साप आहे की दोरी?
इन्स्टाग्रामवर या व्हिडीओला @saiba_19 नावाच्या अकाऊंटवर शेअर करण्यात आलं आहे. हा व्हिडीओ इंटरनेटवर धुमाकूळ घालत असून एका नेटकऱ्याने प्रतिक्रिया देत म्हटलंय, उंदीर खाणाऱ्या सापाचा रेस्क्यू..त्यांच्या आवडीचं खाणं म्हणजे उंदीर, त्यामुळे त्यांना रॅट स्नेक असं नावं देण्यात आलं आहे. ते आकाराने मोठे असतात आणि खूप भीतीदायक असतात. पण रॅट स्नेक विषारी नसतात आणि माणसांसाठी धोक्याचे ठरू शकतात. दुसऱ्या यूजरने म्हटलं, खतरों की खिलाडी..तर एका अन्य यूजरने म्हटलं, अशा धाडसी महिलेचा आपण आदर केला पाहिजे.
हे ही वाचा >> Optical Illusion : भल्या भल्यांना नाही जमलं! 10 सेकंदात शोधून दाखवा फोटोत लपलेला साप
ADVERTISEMENT