मैत्रिणीनेच उगवला सूड! ओळख पटू नये म्हणून मृतदेह विवस्त्र करून शिर केलं धडावेगळं

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

विकास राजूरकर, चंद्रपूर

ADVERTISEMENT

गेल्या आठवड्यात एका घटनेनं चंद्रपूर जिल्हा हादरला होता. धडावर मुंडकं नसलेला एक मृतदेह पोलिसांना सापडल्यानं खळबळ उडाली होती. अखेर या घटनेचं गुढ उलगडवण्यात पोलिसांना यश आलं आहे. अपमानाचा बदला घेण्यासाठी मैत्रिणीनेच हत्या केल्याचं तपासातून समोर आलं आहे.

या प्रकरणी अल्पवयीन मुलीला पोलिसांनी ताब्यात घेतलं असून, तिच्यासोबतचा साथीदार युवक फरार आहे. दरम्यान, मयत मुलीचं शीर अजूनही पोलिसांना सापडलेलं नाही.

हे वाचलं का?

धक्कादायक.. कॉलेजमागे आढळला मुंडकं छाटलेला, नग्नावस्थेतील तरुणीचा मृतदेह!

भद्रावती शहरातील सुमठाना परिसरात शासकीय ITI कॉलेजच्या समोर असणाऱ्या शेतात एका तरुणीचा मुंडकं गायब असलेला मृतदेह ४ एप्रिल रोजी दुपारी आढळून आला होता. शासकीय ITI कॉलेजच्या समोर अमोल झाडे यांचं शेत आहे. दुपारी ते आपल्या शेतात जात असताना बाजूच्या शेतात एका तरुणीचा विवस्त्र अवस्थेतील मृतदेह त्यांना दिसला. जेव्हा ते मृतदेहाच्या जवळ गेले तेव्हा त्यांना प्रचंड धक्का बसला. कारण तरुणीचं मुंडकं नसलेला मृतदेह तिथे पडला होता. त्यामुळे अमोल यांनी याप्रकरणाची माहिती तात्काळ पोलिसांना दिली होती.

ADVERTISEMENT

या प्रकरणात तब्बल ६ दिवसांनी पोलिसांच्या तपासातून धक्कादायक माहिती समोर आली आहे. अपमानाचा बदला घेण्यासाठी मैत्रिणीनेच मैत्रिणीची एका साथीदाराच्या मदतीने हत्या केल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

ADVERTISEMENT

पोलिसांनी हत्या करणाऱ्या विधीसंघर्ष मुलीला ताब्यात घेतलं आहे. तिचा साथीदार असलेला आरोपी अद्याप फरार आहे. मयत मुलीच्या शिराचाही पोलिसांकडून शोध घेतला जात असून, अजूनही ते सापडलेले नाही.

एकाच रूममध्ये राहणाऱ्या दोन मैत्रिणींच्या असूयेतून ही हत्या झाल्याचा दावा चंद्रपूर पोलिसांनी केला आहे. तेलवासा भागात ४ एप्रिल रोजी सकाळी निर्जन जागी युवतीचे विवस्त्र शव आढळले होते. घटनास्थळी कुठलाच पुरावा अथवा युवतीची ओळख पटविणारी बाब आढळून आली नाही. त्यामुळे तपास यंत्रणा दीर्घकाळ अंधारात होत्या.

पोलिसांची सायबर शाखा यासाठी काम करत होती. त्यातून मुलगी नागपूरजवळील रामटेक येथील रहिवासी असून, कुटुंबापासून वेगळी राहत असल्याने तिच्या बेपत्ता होण्याची तक्रार नव्हती.

घटनेच्या दिवशी आरोपी मयत मुलीला मृतदेह सापडलेल्या निर्जन ठिकाणी घेऊन आले. युवतीला दुचाकीवरून घेऊन आल्यानंत त्यांनी भांडण उकरून काढलं. त्यानंतर धारदार शस्त्राने तिची हत्या केल्याचं उघड झाले आहे. पुरावा मिळू नये यासाठी आरोपींनी मयत मुलीचा मृतदेह विवस्त्र केला आणि शिर धडावेगळं केलं. त्याचबरोबर सर्व वस्तू (मोबाईल) नष्ट केल्या.

सायबर शाखेच्या तांत्रिक तपासात पुढे आलेल्या बाबींवरून एका अल्पवयीन मुलीला ताब्यात घेण्यात आलं आहे. मयत मुलगी या अल्पवयीन मुलीला सतत अपमानीत करत होती, अशी माहिती तपासातून पुढे आली आहे.

या प्रकरणात दुसरा पुरुष आरोपीचा सहभाग असल्याचं समोर आलं आहे. हा आरोपी फरार आहे. या हत्या प्रकरणात पोलीस महत्वाचे दुवे जोडून पुढील तपास करत आहेत.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT