अनिल देशमुखांवरील आरोपांची CBI चौकशी ! जाणून घ्या आज कोर्टात काय घडलं?
मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर केलेल्या आरोपांसंदर्भात आज उच्च न्यायालयाने CBI चौकशीचे आदेश दिले आहेत. उच्च न्यायालयाने दिलेल्या या आदेशांनंतर गृहमंत्री अनिल देशमुख यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. अनिल देशमुख यांनी सचिन वाझे यांच्याकडे १०० कोटींची मागणी केल्याचा आरोप परमबीर सिंग यांनी आपल्या पत्रात केला होता. परमबीर सिंग […]
ADVERTISEMENT

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर केलेल्या आरोपांसंदर्भात आज उच्च न्यायालयाने CBI चौकशीचे आदेश दिले आहेत. उच्च न्यायालयाने दिलेल्या या आदेशांनंतर गृहमंत्री अनिल देशमुख यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. अनिल देशमुख यांनी सचिन वाझे यांच्याकडे १०० कोटींची मागणी केल्याचा आरोप परमबीर सिंग यांनी आपल्या पत्रात केला होता. परमबीर सिंग यांच्या पत्रानंतर राज्यातलं राजकारण चांगलंच तापलं होतं.
परमबीर सिंग यांच्या याचिकेवरचा विकाल उच्च न्यायालयाने राखून ठेवला होता. ज्यावर आज निकाल देत असताना मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती दिपांकर दत्ता आणि गिरीश कुलकर्णी यांच्या खंडपीठाने सीबीआयला देशमुख यांच्यावर झालेल्या आरोपांची चौकशी करण्याचे आदेश देऊन १५ दिवसांमध्ये अहवाल सादर करण्याचे आदेश दिले. जाणून घ्या आज सुनावणीदरम्यान नेमकं काय काय घडलं? परमबीर सिंग यांच्या याचिकेवर निर्णय देताना मुंबई उच्च न्यायालयाने काही महत्वाची निरीक्षण नोंदवली आहेत.
FIR का दाखल झाला नाही?
परमबीर सिंग यांच्या आरोपांवर सीबीआय चौकशीचे आदेश देताना मुंबई उच्च न्यायालयही द्विधा मनस्थितीत होतं. कोणत्याही गुन्ह्याची किंवा आरोपाची चौकशी करण्यासाठी आधी FIR नोंदवलं जाणं हे गरजेचं असल्याचं मत मुख्य न्यायमूर्ती दत्ता यांनी नोंदवलं. पोलिसांत तक्रार दाखल करण्याऐवजी कोणत्याही प्रकरणाची चौकशी करण्यासाठी न्यायालयाकडे येण्याबद्दल न्यायमूर्ती दत्ता यांनी नाराजी व्यक्त केली. अशा प्रकरणामध्ये परमबीर सिंग यांनी मुख्यमंत्र्यांना फक्त पत्र लिहणं पुरेसं नव्हतं हे मतही खंडपीठाने व्यक्त केलं.










