Pune : धर्मांतर, लव जिहाद विरोधात पुण्यात आज हिंदू जनआक्रोश मोर्चा!

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

Hindu janajagruti samiti protest in Pune : धर्मांतर आणि लव जिहाद विरोधात कायदा करण्याच्या मागणीने गेल्या काही महिन्यांपासून जोर धरला आहे. राज्यातील विविध ठिकाणी या मागणीसाठी मोर्चे काढण्यात आले असून, आज पुण्यातही याच मागणीच्या अनुषंगाने हिंदू जनआक्रोश मोर्चा काढण्यात येत आहे. या मोर्चात तुकाराम महाराजांचे वंशजही सहभागी होण्यार असल्याची माहिती मोर्चाच्या आयोजकांकडून देण्यात आली आहे.

ADVERTISEMENT

धर्मांतर, गोहत्या आणि लव जिहाद यासाठी कडक कायदे करावेत व त्यांची कठोर अंमलबजावणी करावी आणि धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांचा बलिदान दिवस धर्मवीर दिन म्हणून साजरा करावा या मागण्यांसाठी सकल हिंदू समाजाच्या वतीने आज (22 जानेवारी) ‘हिंदू जन आक्रोश मोर्चा’चे आयोजन करण्यात आले आहे. या मोर्चात ३० हजार हिंदू नागरिक सहभागी होतील, अशी माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली.

विश्व हिंदू परिषदचे किशोर चव्हाण, पतित पावन संघटनेचे स्वप्निल नाईक, श्री शंभू चरित्र अभ्यासक नीलेश भिसे, राजे शिवराय प्रतिष्ठानचे महेश पवळे यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.

हे वाचलं का?

भाजपचे आमदार शिवेंद्रराजे भोसले, तेलंगणाचे आमदार राजा भैया, तुकाराम महाराजांचे वंशज शिवाजीराव मोरे, शिरीष मोरे, धनंजय देसाई हेही हिंदू जनआक्रोश मोर्चात सहभागी होणार असल्याची माहिती मोर्चाच्या आयोजकांकडून देण्यात आली आहे.

हिंदू जनआक्रोश मोर्चा : असा असेल मोर्चाचा मार्ग

रविवारी (22 जानेवारी) सकाळी 10 वाजता लाल महाल येथून मोर्चाची सुरूवात होईल. श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीची महाआरती करून लक्ष्मी रस्त्याने हा हिंदू जनआक्रोश मोर्चा डेक्कन परिसरातील धर्मवीर संभाजी महाराजांच्या स्मारकाजवळ पोहोचणार आहे.

ADVERTISEMENT

हा मोर्चा अभूतपूर्व असा होणार असल्याचा दावा आयोजकांकडून करण्यात आला आहे. शहरातील राजकीय पक्ष, हिंदुत्ववादी संघटना, व्यापारी, गणेशोत्सव मंडळे या मोर्चात सहभागी होणार आहेत. मोर्चात महिला आणि युवकांचा लक्षणीय सहभाग असेल. सकल हिंदू समाजाच्या ताकदीचे या निमित्ताने दर्शन होईल, असं आयोजकांनी पत्रकार परिषदेत बोलताना सांगितलं.

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT