Honour Killing: डॉक्टर होणाऱ्या पोटच्या पोरीची आई-बापानेच केली राख!

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

Nanded Honour killing Case: नांदेड: महाराष्ट्रात (Maharashtra) आतापर्यंत अनेक ऑनर किलिंगची (Honour killing) प्रकरणं समोर आलं आहे. अशीच घटना आता नांदेडमध्ये (Nanded) घडली आहे. ज्यामध्ये आई-वडिलांना आपल्या पोटच्या मुलीची हत्या (Murder) केल्याची घटना समोर आली आहे. ज्यामध्ये मुलीचे मामा आणि दोन भावांचाही समावेश असल्याचं समजतं आहे. पाचही आरोपी हे मुलीची हत्या करुन थांबले नाही तर त्यांनी तिचा मृतदेह देखील जाळून टाकला. अवघ्या काही दिवसात तरुणी ही डॉक्टर होणार होती मात्र फक्त एका गोष्टीमुळे तिच्या कुटुंबीयांनीच तिचा निर्घृणपणे जीव घेतला. (honour killing a girl who dreamed of becoming a doctor was killed by her parents)

मिळालेल्या माहितीनुसार, तरुणीचे गावातीलच तरुणाशी प्रेमसंबंध होते. मात्र, जेव्हा या गोष्टीची कुणकुण मुलीच्या आई-वडिलांना लागली तेव्हा मात्र, तिला घरातून या गोष्टीला विरोध झाला. अखेर खोठ्या प्रतिष्ठेपायी मुलीच्या आई-वडिलांसह तिच्या जवळच्याच नातेवाईकांनी मुलीची हत्या करुन तिच्या मृतदेहाची राख ही जवळच्या नाल्यात फेकून दिली.

भयंकर! बेदम मारहाण करत पतीची हत्या; गावात कळू नये म्हणून शेतात नेऊन जाळला मृतदेह

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

नेमकी घटना काय?

नांदेड जिल्ह्यातील लिंबगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पिंपरी महिपाळ गावातील रहिवासी जनार्दन जोगदंड यांच्या कुटुंबीयांनी स्वतःच्या मुलीची निर्घृण हत्या केल्याची घटना समोर आली आहे. एवढेच नाही तर या मुलीची हत्या करून तिचा मृतदेह जाळण्यात आला, त्यानंतर मृतदेहाची राख जवळच्या नाल्यात फेकण्यात आली.

शुभांगी जोगदंड असे मृत मुलीचे नाव आहे. शुभांगी बीएचएमएसच्या तिसऱ्या वर्षात शिकत होती. या प्रकरणी पोलिसांनी मुलीचे आई-वडील, दोन भाऊ आणि मामासह पाच जणांना अटक केली आहे. प्रेमप्रकरणातून ही हत्या झाल्याची माहिती समोर येत आहे.

ADVERTISEMENT

ऑनर किलिंग! पतीने केली पत्नीची हत्या, मुंडकं रस्त्यावर मिरवलं; व्हायरल व्हीडिओमुळे खळबळ

ADVERTISEMENT

गावातील तरुणांशी जुळलेलं सूत

शुभांगी जोगदंड या नांदेड जिल्ह्यातील पिंपरी महिपाळ येथील रहिवासी आहे. ती बीएचएमएसच्या तृतीय वर्षाची विद्यार्थिनी होती. तिचे गावातील एका तरुणाशी प्रेमसंबंध होते. मात्र शुभांगीच्या कुटुंबीयांनी ते मान्य केले नाही. दुसरीकडे, कुटुंबीयांनी तीन महिन्यांपूर्वी शुभांगीचं झटपट लग्न जुळवून तिचा साखरपुडा देखील उरकला होता, मात्र आठच दिवसांपूर्वी शुभांगीच्या प्रेमसंबंधांबाबत माहिती मिळाल्याने तिचं जुळलेलं लग्न मोडण्यात आलं.

सोयरिक मोडल्याने आता गावात आपले नाव बदनाम होईल या रागातून मागी रविवारी (22 जानेवारी) आई-वडिलांनी शुभांगीच्या मामा आणि तिच्या दोन भावांच्या साथीने तिची निर्घृण हत्या केली. त्यानंतर तिचा मृतदेह स्वतःच्या शेतात नेऊन जाळूनही टाकला. तसंच कोणताही पुरावा मागे राहू नये यासाठी या सर्वांना शुभांगीच्या मृतदेहाची राख ही जवळच असलेल्या नाल्यात फेकून दिली.

शुभांगीच्या हत्येचा छडा कसा लागला?

दरम्यान, गेल्या तीन दिवसांपासून शुभांगी गावात दिसत नसल्याची गुप्त माहिती नांदेड पोलिसांना मिळाली. मिळालेल्या गुप्त माहितीनुसार पोलिसांनी तपास केला असता शुभांगीचा खून झाल्याचे निष्पन्न झाले. ज्यामध्ये पोलिसांनी शुभांगीचे आई-वडील, दोन भाऊ, मामा यांच्यासह पाच जणांना अटक केली. त्यांच्याच जबाबातून हत्या झाल्याचं समोर आलं.

लिमगाव पोलीस ठाण्यात कलम 302, 201,120 अन्वये पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस या प्रकरणाच्या तपास करीत आहेत.

दरम्यान, या प्रकरणाने अवघ्या नांदेड जिल्ह्यात खळबळ माजली आहे. मुलीच्या मारेकऱ्यांना कठोरात-कठोर शिक्षा करण्यात यावी अशी मागणी आता करण्यात येत आहे.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT