पुणे हादरलं! आठवीत शिकणाऱ्या मुलीवर कोयत्याने वार, एकतर्फी प्रेमातून हत्या झाल्याचा अंदाज

मुंबई तक

विद्येचं माहेरघर म्हणून ओळख असलेलं पुणे पुन्हा एकदा हत्येच्या घटनेमुळे हादरलं आहे. आठवीत शिकणाऱ्या एका कबड्डीपटू मुलीवर कोयत्याने सपासप वार करण्यात आले आहेत. या घटनेत मुलीचा जागेवरच मृत्यू झाला असून हा हल्ला आरोपीने एकतर्फी प्रेमातून केल्याचा पोलिसांचा अंदाज आहे. क्षितीजा अनंत व्यवहारे असं या मुलीचं नाव असून आरोपीचं नाव शुभम भागवत असं आहे. या घटनेबद्दल […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

विद्येचं माहेरघर म्हणून ओळख असलेलं पुणे पुन्हा एकदा हत्येच्या घटनेमुळे हादरलं आहे. आठवीत शिकणाऱ्या एका कबड्डीपटू मुलीवर कोयत्याने सपासप वार करण्यात आले आहेत. या घटनेत मुलीचा जागेवरच मृत्यू झाला असून हा हल्ला आरोपीने एकतर्फी प्रेमातून केल्याचा पोलिसांचा अंदाज आहे.

क्षितीजा अनंत व्यवहारे असं या मुलीचं नाव असून आरोपीचं नाव शुभम भागवत असं आहे.

या घटनेबद्दल पोलिस उपायुक्त नम्रता पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार, क्षितिजा अनंत व्यवहारे ही मुलगी सायंकाळच्या सुमारास कबड्डीच्या सरावा करीता आली होती. तेव्हा त्या मुलीच्या नात्यातील हृषिकेश ऊर्फ शुभम भागवत हा त्याच्या मित्रा सोबत दुचाकीवरून आला.काही समजण्याच्या आत क्षितिजावर कोयत्याने आणि चाकूने सपासप वार केले.

पुण्यातील संतापजनक घटना! 14 वर्षाच्या मुलीचं अपहरण; आठ जणांनी केला सामूहिक बलात्कार

हे वाचलं का?

    follow whatsapp