मर्सिडिजची धडक, सख्ख्या भावांचा मृत्यू; हॉटेलियरच्या मुलाला अटक

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

नवी मुंबईतील पामबीच येथे झालेल्या एका भीषण अपघातात दोन सख्ख्या भावडांचा मृत्यू झाला असून याप्रकरणी अॅबॉट हॉटेलच्या मालकाच्या मुलाला अटक करण्यात आली आहे. अपघातात मृत्यूमुखी पडलेले हे दोन्ही तरुण एका पोलीस अधिकाऱ्याची मुलं असल्याची माहिती मिळत आहे. मर्सिडीज आणि बाइकचा हा अपघात एवढा भीषण होता की ज्यामध्ये बाइकचा अक्षरश: चक्काचूर झाला आहे.

हा अपघात काल (रविवार) मध्यरात्री दीड वाजेच्या सुमारास घडला. ज्यामध्ये अक्षय गमरे (वय 27 वर्ष) आणि संकेत गमरे (वय 24 वर्ष) यांचा दुर्दैवी अंत झाला. हे दोघेही आपल्या बाइकवरुन जात असताना पाम बीचजवळ एका वेगाने येणाऱ्या मर्सिडीज कारने त्यांना जोरदार धडक दिली.

या अपघाताबाबत प्रत्यक्षदर्शींनी एपीएमसी पोलीस स्टेशनच्या पोलीस अधिकाऱ्यांना असी माहिती दिली की, मर्सिडीज कार ही सानापड्याच्या दिशेना जाण्यासाठी एका जंक्शनवर वळत असतानाच अचानक एक बाइक समोर आली. त्यामुळे हा अपघात घडला. पण ही धडक एवढी जोरदार होती की, घटनास्थळापासून बाइक जवळजवळ ५० मीटर दूर फेकली गेली. त्यामुळे बाइकवरील दोघंही गंभीर जखमी झाले. त्यांना तात्काळ नवी मुंबईच्या सिव्हिक रुग्णालयात नेण्यात आलं.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

दरम्यान, या अपघातानंतर मर्सिडिज कारच्या ड्रायव्हरने तात्काळ घटनास्थळावरुन पळ काढला. याप्रकरणी पोलिसात गुन्हा दाखल होताच पोलीस अधिकाऱ्यांनी आरटीओशी संपर्क साधून कार चालकाचा पत्ता शोधून काढत त्याला अटकही केली. यावेळी पोलिसांनी रोहन अॅबॉट याला या अपघाताप्रकरणी अटक केली. जो अपघातावेळी स्वत: कार चालवत होता. सध्या पोलीस याबाबत देखील तपास करत आहेत की, जेव्हा ही घटना घडली तेव्हा रोहन हा दारुच्या नशेत होता का? रोहन अॅबॉट याच्या वडिलांचं नवी मुंबईत एक थ्री स्टार हॉटेल असल्याची देखील माहिती यावेळी पोलिसांना मिळाली आहे.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT