थेट राज ठाकरेंना आव्हान देणारे ब्रिजभूषण सिंह कसे बनले ‘राजकीय बाहुबली’?
मुंबई: मनसे अध्यक्ष राज ठाकरेंना आव्हान देणारे भाजप खासदार ब्रिजभूषण सिंह हे उत्तर प्रदेशच्या राजकारणातील एक बाहुबली समजले जातात. त्यांचा हा सगळा राजकीय प्रवास नेमका कसा आहे हे जाणून घेऊयात सविस्तर. ब्रिजभूषण सिंह यांच्या बाहुबली बनवण्याचा प्रवास… ब्रिजभूषण सिंह यांच्या बाहुबली बनण्याच्या प्रवासाची सुरुवात अगदी एका छोट्या घटनेने झाली होती. ब्रिजभूषण सिंह हे त्यांच्या गावाजवळील […]
ADVERTISEMENT

मुंबई: मनसे अध्यक्ष राज ठाकरेंना आव्हान देणारे भाजप खासदार ब्रिजभूषण सिंह हे उत्तर प्रदेशच्या राजकारणातील एक बाहुबली समजले जातात. त्यांचा हा सगळा राजकीय प्रवास नेमका कसा आहे हे जाणून घेऊयात सविस्तर.
ब्रिजभूषण सिंह यांच्या बाहुबली बनवण्याचा प्रवास…
ब्रिजभूषण सिंह यांच्या बाहुबली बनण्याच्या प्रवासाची सुरुवात अगदी एका छोट्या घटनेने झाली होती. ब्रिजभूषण सिंह हे त्यांच्या गावाजवळील एका महाविद्यालयात जात होते. वाटेत काही जण मुलींची छेड काढत होते. ब्रिजभूषण यांनी त्यांना विरोध केला ते त्या रोडरोमियांना थेट भिडले. या एका घटनेने ते विद्यार्थी नेता म्हणून प्रस्थापित झाले.
कुस्तीपटू ब्रिजभूषण यांना अल्पावधीतच तरुणांची भरभरून साथ मिळाली. 1979 मध्ये त्यांनी विद्यार्थी संघटनेची निवडणूक विक्रमी मतांनी जिंकली होती. येथूनच ब्रिजभूषण यांची बाहुबली नेता बनण्याची प्रक्रिया सुरू होते.