ओमिक्रॉनवर कोव्हिशिल्ड किती प्रभावी? काय म्हणाले अदर पूनावाला?

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेतून देश सावरतो आहे. अशातच भीती निर्माण झाली आहे ती दक्षिण अफ्रिकेत आढळलेल्या ओमिक्रॉन व्हेरिएंटची. हा व्हेरिएंट घातक असल्याने त्याला व्हेरिएंट ऑफ कन्सर्न संबोधण्यात आलं आहे. लसी या व्हेरिएंटवर किती प्रभावी ठरतात? या प्रश्नाची चर्चा होते आहे. अशात कोव्हिशिल्ड या ओमिक्रॉनवर प्रभावी आहे का? याचं उत्तर अदर पूनावाला यांनी दिलं आहे.

ADVERTISEMENT

Omicron Variant : ‘ओमिक्रॉन’मुळे शाळा सुरू करण्याचा निर्णय लांबणार?; टोपेंनी दिली माहिती

काय म्हणाले आहेत अदर पूनावाला?

हे वाचलं का?

जगभरात जनजीवन पूर्ववत होत असताना ओमिक्रॉन व्हायरसच्या व्हेरिएंटने थैमान घालण्याची सुरूवात केली आहे. यावर कोव्हिशिल्ड प्रभावी आहे का? हे येत्या दोन-तीन आठवड्यात समजेल असं अदर पूनावाला यांनी म्हटलं आहे. ओमिक्रॉन हा विषाणू किती गंभीर हे आत्ताच सांगता येणार नाही. मात्र ओमिक्रॉन पाहता बूस्टर डोस शक्य आहे असंही पूनावाला यांनी म्हटलं आहे. एनडीटीव्हीला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी हे वक्तव्य केलं आहे.

सरकारने दोन डोस पूर्ण करण्यावर आता भर दिला पाहिजे. लवकरात लवकर हे लक्ष्य पूर्ण केलं पाहिजे असंही पूनावाला यांनी स्पष्ट केलं. कोव्हिशिल्ड ही लस कोरोनाच्या डेल्टा व्हेरिएंटचा सामना करण्यासाठी सक्षम होती. तसंच रूग्णालयात दाखल होण्याची आणि मृत्यू होण्याची शक्यताही या लसीमुळे कमी होते असं लॅन्सेटच्या अहवालातही नमूद करण्यात आलं होतं. कोव्हिशिल्डचा ओमिक्रॉन व्हेरिएंटवर कसा परिणाम होतो. ही लस या व्हेरिएंटसाठीही प्रभावी ठरते का? हे पाहण्यासाठी आपल्याला किमान तीन आठवडे वाट बघावी लागेल. ऑक्सफर्डच्या वैज्ञानिकांनी यावर संशोधन सुरू केलं आहे असंही पूनावाला यांनी स्पष्ट केलं.

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

व्हेरिएंट आणि म्युटेशन म्हणजे काय?

व्हायरसचाही जिनोम सिक्वेन्स (जनुकीय रचना) असतो. व्हायरच्या जिनोममध्ये सातत्याने बदल होतं जातो, त्यालाच म्युटेशन असं म्हटलं जातं. कोरोना व्हायरच्या जिनोममध्येही सातत्याने बदल होत असून, जगभरात चार व्हेरिएंट ऑफ कन्सर्न (अल्फा, बीटा, गामा, डेल्टा ), तर दोन व्हेरिएंट ऑफ इंटरेस्ट (ल्युम्ब्डा, म्यू) आढळून आले आहेत. यातच आता दक्षिण आफ्रिकेत B.1.1.529 हा व्हेरिएंट आढळून आला असून, तो व्हेरिएंट ऑफ कन्सर्न आहे. B.1.1.529 या कोरोना व्हेरिएंट जागतिक आरोग्य संघटनेनं ओमिक्रॉन व्हेरिएंट असं नाव दिलं आहे.

Omicron Variant: दक्षिण आफ्रिकेतील ओमिक्रॉन व्हेरिएंट किती धोकायदायक? लस प्रभावी आहे का?

जागतिक आरोग्य संघटनेनं काय म्हटलं आहे?

जागतिक आरोग्य संघटनेनं या व्हेरिएंटबद्दल बोलताना शुक्रवारी म्हटलं आहे की, संघटनेच्या टेक्निकल सल्लागार गटाने या व्हेरिएंटबद्दल आढावा बैठक घेतली आणि त्या बैठकीत या व्हेरिएंटला व्हेरिएंट ऑफ कन्सर्न म्हणून निश्चित करण्यात आलं. याचाच अर्थ असा की ओमिक्रॉनमध्ये एक किंवा त्यापेक्षा अधिक बदल असल्याचं निर्दशनास आलं आहे. ज्यात संक्रमणाचा प्रचंड वेग, लस आणि उपचारांच्या परिणामकारकतेत घट हे बदल आहेत.

या व्हेरिएंटचे 100 पेक्षाही कमी जिनोम सिक्वेन्स उपलब्ध असून, त्याबद्दल आमच्याकडे जास्त माहिती नाही. या व्हेरिएंटचे खूप सारे म्युटेशन असल्याचं आम्हाला माहिती आहे आणि याचा परिणाम व्हायरसच्या बिहेविअरही होऊ शकतो. या व्हेरिएंटला पूर्णपणे समजून घेण्यासाठी आणखी काही आठवडे लागू शकतात, असं WHO ने म्हटलं आहे.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT