चंद्रपुरात कोरोना रुग्णसंख्येचा स्फोट, 24 तासात ‘एवढे’ पॉझिटिव्ह
चंद्रपूर जिल्ह्यात मागील 24 तासात 54 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे. तर 176 कोरोनाबाधीत रुग्णांची नव्याने भर पडली असून एका बाधिताचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्यात आतापर्यंत एकूण बाधितांची संख्या 24 हजार 49 वर पोहोचली आहे. तसेच सुरवातीपासून आतापर्यंत बरे झालेल्यांची संख्या 23 हजार 94 झाली आहे. सध्या 555 बाधितांवर उपचार […]
ADVERTISEMENT
चंद्रपूर जिल्ह्यात मागील 24 तासात 54 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे. तर 176 कोरोनाबाधीत रुग्णांची नव्याने भर पडली असून एका बाधिताचा मृत्यू झाला आहे.
ADVERTISEMENT
जिल्ह्यात आतापर्यंत एकूण बाधितांची संख्या 24 हजार 49 वर पोहोचली आहे. तसेच सुरवातीपासून आतापर्यंत बरे झालेल्यांची संख्या 23 हजार 94 झाली आहे. सध्या 555 बाधितांवर उपचार सुरू आहेत. आतापर्यंत दोन लाख 19 हजार 777 नमुन्यांची तपासणी करण्यात आली असून त्यापैकी एक लाख 93 हजार 518 नमुने निगेटीव्ह आले आहेत.
आज मृत झालेल्यामध्ये बल्लारशा येथील 68 वर्षीय महिलेचा समावेष आहे. जिल्ह्यात आतापर्यंत 400 बाधितांचे मृत्यू झाले असून यापैकी चंद्रपूर जिल्ह्यातील 362, तेलंगणा एक, बुलडाणा एक, गडचिरोली 18, यवतमाळ 16, भंडारा एक आणि वर्धा येथील एका बाधिताचा समावेश आहे.
हे वाचलं का?
आज बाधित आलेल्या 176 रुग्णांमध्ये चंद्रपूर महानगर पालीका क्षेत्रातील 33, चंद्रपूर तालुक्यातील एक, बल्लारपूर एक, भद्रावती आठ, ब्रम्हपुरी एक, नागभिड तीन, सावली 19, राजूरा आठ, चिमुर सहा, वरोरा 59, कोरपना 14, जीवती 20 व इतर ठिकाणच्या तीन रुग्णांचा समावेश आहे.
कोरोनाचे रूग्ण कमी-अधिक प्रमाणात बहुतांश तालुक्यातुन आढळून येत आहेत. नागरिकांनी कोरोना पूर्णपणे संपला या मानसिकतेतून बाहेर यावे आणि मास्कचा वापर, वारंवार हात धुणे व सुरक्षीत अंतर राखणे या त्रीसुत्रीचा नियमित वापर करून सुरक्षीत राहण्याचे आवाहन जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी केले आहे.
ADVERTISEMENT
4 मार्च 2021 (कोरोना रुग्णसंख्या अपडेट)
ADVERTISEMENT
चंद्रपूर जिल्ह्यात मागील 24 तासात 14 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे. तर 70 कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर पडली आहे.
जिल्ह्यात आतापर्यंत एकूण बाधितांची संख्या 23 हजार 873 वर पोहोचली आहे. तसेच सुरवातीपासून आतापर्यंत बरे झालेल्यांची संख्या 23 हजार 40 झाली आहे. सध्या 434 बाधितांवर उपचार सुरू आहेत. आतापर्यंत दोन लाख 18 हजार 284 नमुन्यांची तपासणी करण्यात आली असून त्यापैकी एक लाख 92 हजार 331 नमुने निगेटीव्ह आले आहेत. (how many people have corona positive in the last 24 hours in chandrapur district)
औरंगाबादमधल्या कोरोना सेंटरमध्ये महिलेबरोबर नेमकं काय घडलं?
जिल्ह्यात आतापर्यंत 399 बाधितांचे मृत्यू झाले असून यापैकी चंद्रपूर जिल्ह्यातील 360, तेलंगणा एक, बुलडाणा एक, गडचिरोली 18, यवतमाळ 16, भंडारा एक आणि वर्धा येथील एका बाधिताचा समावेश आहे. आज बाधित आलेल्या 70 रुग्णांमध्ये चंद्रपूर महानगरपालिका क्षेत्रातील 20, चंद्रपूर तालुक्यातील एक, बल्लारपूर सहा, सिंदेवाही दोन, मूल 10, राजूरा तीन, वरोरा 26, कोरपना एक व इतर ठिकाणच्या एका रुग्णांचा समावेश आहे.
Corona टाळण्यासाठी नवरदेवाची उंटावरून वरात, बीडमधलं लग्न चर्चेत
कोरोनाचे रूग्ण कमी-अधिक प्रमाणात बहुतांश तालुक्यातुन आढळून येत आहेत. नागरिकांनी कोरोना पूर्णपणे संपला या मानसिकतेतून बाहेर यावे आणि मास्कचा वापर, वारंवार हात धुणे व सुरक्षित अंतर राखणे या त्रिसूत्रीचा नियमित वापर करून सुरक्षित राहण्याचे आवाहन जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी केले आहे.
महाराष्ट्रातील प्रमुख शहरं आणि अॅक्टिव्ह रूग्णांची संख्या
शहर अॅक्टिव्ह रूग्ण
मुंबई ९ हजार ४१
ठाणे ९ हजार १४२
पुणे १७ हजार ५२२
सातारा १ हजार ४४०
नाशिक २ हजार ७७९
जळगाव ३ हजार ३५७
औरंगाबाद ३ हजार २७०
अमरावती ५ हजार ५११
अकोला ४ हजार १६२
नागपूर १० हजार ६६२
दरम्यान, महाराष्ट्रात मागील २४ तासांमध्ये ८ हजार ९९८ नवे कोरोना रूग्ण पॉझिटिव्ह आढळले आहेत. तर ६० मृत्यूंची नोंद झाली आहे. राज्यातील मृत्यूदर हा २.३९ टक्के इतका आहे. तर आज राज्यात ६ हजार १९५ रूग्ण बरे होऊन घरी गेले आहेत.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT