कोरोनाग्रस्त रूग्णांची काळजी कशी घ्यावी; अभिनेत्री करिना कपूरने शेअर केली खास पोस्ट

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

सध्या देशातील प्रत्येकजण कोरोनाच्या गंभीर परिस्थितीशी लढा देतोय. या दरम्यान बॉलिवूजमधील कलाकार देखील प्रोटोकॉलनुसार त्यांच्या फॅन्सना काळजी घेण्याचं आवाहन करत आहेत. तर या बॉलिवूड कलाकारांच्या लिस्टमध्ये आता अभिनेत्री करिना कपूर खानचं नाव देखील जोडलं आहे. अभिनेत्री करिनाने तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवरून एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये तिने जागतिक आरोग्य संघटनेची मार्गदर्शकतत्त्व लोकांपर्यंत पोहोचवली आहेत.

ADVERTISEMENT

करिनाने इन्स्टाग्रामवरून ही पोस्ट शेअर केली आहे. या स्टोरीमध्ये करिनाने जागतिक आरोग्य संघटनेचे सर्व प्रोटोकॉल टप्प्याटप्याने सांगितले आहेत. ज्यामध्ये कोरोनापासून स्वताःला सुरक्षित कसं ठेवावं तसंच कोरोनाने ग्रस्त असलेल्या रूग्णांची योग्य पद्धतीने काळजी कशी घ्यायची याची माहिती देण्यात आली आहे.

हे वाचलं का?

करिनाने शेअर केलेल्या पोस्टनुसार,

– पहिल्या टप्प्यात आजारी व्यक्ती व्यक्तींना आयसोलेट करावं

ADVERTISEMENT

– दुसऱ्या टप्प्यात ज्या व्यक्तीला कोरोनाची लागण झाली आहे त्या व्यक्तीपासून स्वतःचं संरक्षण कसं करावं

ADVERTISEMENT

– तिसऱ्या टप्प्यात, कोरोनाग्रस्त व्यक्तीची काळजी घेण्यासाठी गाईलाईन्स देण्यात आल्या आहेत.

मास्क न लावणाऱ्यांवर करिना कपूर संतापली; म्हणाली…

दरम्यान नुकतंच काही दिवसांपूर्वी मास्क न वापरणाऱ्या लोकांवर अभिनेत्री करिना कपूर खानने संताप व्यक्त केला होता. यासंदर्भात करिनाने पोस्ट शेअर केली होती. “मला अजूनही कळत नाही लोकं इतक्या निष्काळजीपणे कसे वागू शकतात. सध्या आपल्या देशातील परिस्थिती किती गंभीर आहे याची त्यांना कल्पना असूनही ते असं कसं वागतात हेच मला समजत नाही. प्रत्येक व्यक्तीने घराबाहेर पडाताना योग्य पद्धतीने मास्क लावणं गरजेचं आहे.” असं करिना तिच्या पोस्टमध्ये म्हणाली होती.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT