WhatsApp वरून नंबर सेव्ह न करता पाठवा मेसेज; या टिप्स वाचा

मुंबई तक

WhatsApp आता संवादाबरोबरच माहितीची देवाण-घेवाण करण्यासाठी महत्त्वाचं अॅप बनलं आहे. WhatsApp नसेल अशी व्यक्ती लवकर सापडणार नाही. WhatsApp मुळे संवादाची प्रक्रिया सोप्पी झाले आहे. आपल्या जवळपासच्या माणसाचे नंबर सेव्ह असतात. पण अनेकवेळा अनोळखी माणसांना मेसेज पाठवायचे असेल, तर त्यांचे नंबर सेव्ह करावेच लागतात. अशा वेळी मोबाईल नंबर सेव्ह करून काम झाल्यानंतर पुन्हा डिलीट करावा लागतो. […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

WhatsApp आता संवादाबरोबरच माहितीची देवाण-घेवाण करण्यासाठी महत्त्वाचं अॅप बनलं आहे.

WhatsApp नसेल अशी व्यक्ती लवकर सापडणार नाही. WhatsApp मुळे संवादाची प्रक्रिया सोप्पी झाले आहे.

आपल्या जवळपासच्या माणसाचे नंबर सेव्ह असतात. पण अनेकवेळा अनोळखी माणसांना मेसेज पाठवायचे असेल, तर त्यांचे नंबर सेव्ह करावेच लागतात.

अशा वेळी मोबाईल नंबर सेव्ह करून काम झाल्यानंतर पुन्हा डिलीट करावा लागतो.

अनेकवेळा नंबर डिलीट करायचं लक्षातून जात आणि तुमच्या स्टेटसचे अपडेट सुद्धा त्या व्यक्तींना जातं.

या सगळ्यात एक चांगला उपाय म्हणजे नंबर सेव्ह न करता मेसेज पाठवणे. यासाठी वेगळी पद्धत आहे.

WhatsApp वरून नंबर सेव्ह न करता अँड्रॉईड वा आयओएस अशा दोन्हीसाठी ही पद्धत उपयोगी ठरते.

त्यासाठी ब्राऊझर (क्रोम वा इतर ब्राऊझर) ओपन करा. त्यानंतर URL मध्ये http://wa.me/xxxxxxxxxx हे टाईप करा.

http://wa.me/xxxxxxxxxx असं टाईप करताना xxxxxxxxxx याठिकाणी ज्याला मेसेज पाठवायचा त्या व्यक्ती मोबाईल नंबर टाका.

मोबाईल नंबर टाका देशाचा कोडही टाका. उदाहरणार्थ http://wa.me/91997055…. अशा पद्धतीने नंबर टाका.

ही प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर एंटर क्लिक करा वा सर्च म्हणा. त्यानंतर एक पेज ओपन होईल. तिथे ज्याला मेसेज पाठवायचा त्याचा नंबर दिसेल.

त्यानंतर तिथेच खाली त्याला मेसेज पाठवण्याचा ऑप्शन दिसेल. त्यावर क्लिक करा.

क्लिक केल्यानंतर WhatsApp ओपन होईल. त्याचबरोबर ज्याला मेसेज पाठवायचा त्या नंबरचा चॅट बॉक्स ओपन होईल. अशा पद्धतीने नंबर सेव्ह न करताही मेसेज पाठवू शकतो.

हे वाचलं का?

    follow whatsapp