अजित पवार गर्दी करू नका सांगतात अन् तुम्ही…; जितेंद्र आव्हाडांवर नेटकरी संतापले
राज्याचे गृहनिर्माण मंत्री तथा राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांच्यावर नेटकरी संतापल्याचं पाहायला मिळालं. आव्हाड यांनी भिंवडीतील त्यांच्या स्वागत यात्रेचा एक व्हिडीओ ट्वीट केला. ज्यात कोरोनाच्या नियमांचं सर्रासपणे उल्लंघन करण्यात आल्याचं दिसत असून, यावरून नेटकऱ्यांनी आव्हाडांना प्रश्न विचारत संताप व्यक्त केला आहे. राज्यावरील कोरोनाचं संकट अजूनही टळलेलं नाही. त्यामुळे राज्य सरकारकडून अजूनही काही प्रमाणात निर्बंध ठेवण्यात […]
ADVERTISEMENT

राज्याचे गृहनिर्माण मंत्री तथा राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांच्यावर नेटकरी संतापल्याचं पाहायला मिळालं. आव्हाड यांनी भिंवडीतील त्यांच्या स्वागत यात्रेचा एक व्हिडीओ ट्वीट केला. ज्यात कोरोनाच्या नियमांचं सर्रासपणे उल्लंघन करण्यात आल्याचं दिसत असून, यावरून नेटकऱ्यांनी आव्हाडांना प्रश्न विचारत संताप व्यक्त केला आहे.
राज्यावरील कोरोनाचं संकट अजूनही टळलेलं नाही. त्यामुळे राज्य सरकारकडून अजूनही काही प्रमाणात निर्बंध ठेवण्यात आले आहेत. तर दुसऱीकडे कोरोना रुग्णसंख्या वाढल्यास कडक निर्बंध लावण्याचा इशाराही सरकारकडून दिला जात आहे. अशातच जितेंद्र आव्हाड यांनी ट्वीट केलेला व्हिडीओ लोकांनी संताप व्यक्त केला.
जितेंद्र आव्हाड यांनी कार्यकर्त्यांकडून करण्यात आलेल्या स्वागताच एक व्हिडीओ ट्वीट केला आहे. हा व्हिडीओ भिवंडीतील आहे. या व्हिडीओ मोठ्या संख्येनं कार्यकर्ते दिसत आहे. मोटारसायकलीवरून कार्यकर्ते जात असल्याचं दिसत आहे.
महत्त्वाचं म्हणजे गर्दी टाळण्याचं आणि कोविड नियमांचं पालन करण्याचं आवाहन सातत्याने सरकारकडून केलं जातं आहे. मात्र, राज्याच्या मंत्र्यांच्या स्वागतालाच झालेली गर्दी आणि कोविड नियमांचं करण्यात आलेलं उल्लंघन त्याचबरोबर वाहतूक नियमांचाभंगही करण्यात आल्यावरून आता प्रश्न उपस्थित केले जात आहे.










