धक्कादायक! चारित्र्याच्या संशयावरून पत्नीच्या तोंडात कोंबली उंदीर मारण्याची पूड

मुंबई तक

धनंजय साबळे, प्रतिनिधी, औरंगाबाद आंतरजातीय विवाह केलेल्या पत्नीच्या तोंडात उंदीर मारण्याची पूड कोंबून तिला ठार मारण्याचा प्रयत्न करण्यात आला. ही धक्कादायक घटना २३ फेब्रुवारीला अमरावतीतल्या लोणटेक येथे घडली. याप्रकरणी खोलापुरी गेट पोलिसांनी राहुल हरिशकुमार शर्मा (३५, लोणटेक) याच्याविरुद्ध भादंविच्या कलम ३०७ ४९८अ ५०४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. अनैतिक संबंधामुळे महिलेने गमावला जीव, लॉजवर बोलवून […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

धनंजय साबळे, प्रतिनिधी, औरंगाबाद

आंतरजातीय विवाह केलेल्या पत्नीच्या तोंडात उंदीर मारण्याची पूड कोंबून तिला ठार मारण्याचा प्रयत्न करण्यात आला. ही धक्कादायक घटना २३ फेब्रुवारीला अमरावतीतल्या लोणटेक येथे घडली. याप्रकरणी खोलापुरी गेट पोलिसांनी राहुल हरिशकुमार शर्मा (३५, लोणटेक) याच्याविरुद्ध भादंविच्या कलम ३०७ ४९८अ ५०४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला.

अनैतिक संबंधामुळे महिलेने गमावला जीव, लॉजवर बोलवून प्रियकराने केली हत्या

तक्रारीनुसार, फिर्यादी आणि आरोपीचा आंतरजातीय विवाह झाला आहे. आरोपी हा मद्यपी आहे. तो पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेऊन तिच्यासोबत भांडण करून शिवीगाळ आणि मारहाण करायचा. २३ फेब्रुवारी रोजी आरोपी घरी आला तेव्हा तो मद्याच्या अंमलाखाली होता. त्यावर पत्नीने त्याला तुम्ही बाहेर गेले होते की कामाला, अशी विचारणा केली. त्यावर तू मला विचारणारी कोण? असे म्हणून त्याने तिला मारहाण केली. तिला आपटले. त्यावर मला मारून टाका, अशी ती उद्वेगाने बोलली. तो घरात गेला. आतून उंदिर मारण्याची पुडी आणून ती त्याने पत्नीचे तोंड उघडून तिच्या तोंडात टाकली.

कल्याण : संपत्तीच्या वादातून दिराने केला भावजयीचा गळा आवळून खून

एवढ्यावरच तो थांबला नाही तर त्याने तिला घरात ओढत नेऊन पुन्हा मारहाण केली. या सगळ्यात जखमी झालेल्या महिलेला खासगी दवाखान्यातून इर्विनमध्ये हलविले. ती रात्रभर दवाखान्यात राहिली. २४ फेब्रुवारी रोजी सकाळी ७ वाजतादरम्यान शेजारी महिला तिला

पाहण्यास गेल्या असता आरोपी राहुल शर्माने तिला पुन्हा शिवीगाळ करून थापडा बुक्क्यांनी आणि गॅस शेगडीचे पाईपने पाठीवर मारहाण केली. आरोपीने आपला शारीरीक आणि मानसिक छळ करुन जिवे मारण्याचा प्रयत्न केल्याची तक्रार त्या महिलेने २४ फेब्रुवारी रोजी जखमी महिलेने खोलापुरी गेट पोलिसांत नोंदवली. आरोपी पती हा नेहमीच आपल्याला लाथाबुक्यांनी मारहाण करतो तथा त्याने आपला प्रचंड मानसिक छळ चालविल्याचे पीडिताने सांगितले. आता या प्रकरणी पुढील तपास पोलीस करत आहेत.

जखमी महिलेच्या तक्रारीवरुन तिच्या पतीविरुद्ध गुन्हा नोंदविला. त्याला तातडीने अटक करण्यात आली. पत्नीच्या तोंडात उंदीर मारण्याची पूड टाकल्याची ती तक्रार आहे. त्यावरून गुन्हा नोंदविला आहे अशी माहिती गजानन तामटे, ठाणेदार, खोलापुरीगेट यांनी दिली.

हे वाचलं का?

    follow whatsapp