चारित्र्याच्या संशयावरुन पत्नीची मोबाइल चार्जरच्या केबलने हत्या, पतीनेही घेतला गळफास

मुंबई तक

इंदूर: इंदूरमध्ये मंगळवारी रंगपंचमी साजरी होत असतानाच दुसरीकडे इंदूरच्या द्वारकापुरी भागात एक हृदयद्रावक घटना घडली आहे. येथे एका कंत्राटदाराने आधी आपल्या पत्नीचा मोबाईल चार्जरच्या केबलने गळा आवळून खून केला आणि नंतर स्वत: गळफास घेऊन आत्महत्या केली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रंगपंचमीच्या दिवशी मुले घराबाहेर पडताच ठेकेदाराने हे भयंकर कृत्य केलं. गेल्या अनेक दिवसापासून पतीला पत्नीच्या चारित्र्यावर […]

ADVERTISEMENT

mumbaitak
mumbaitak
social share
google news

इंदूर: इंदूरमध्ये मंगळवारी रंगपंचमी साजरी होत असतानाच दुसरीकडे इंदूरच्या द्वारकापुरी भागात एक हृदयद्रावक घटना घडली आहे. येथे एका कंत्राटदाराने आधी आपल्या पत्नीचा मोबाईल चार्जरच्या केबलने गळा आवळून खून केला आणि नंतर स्वत: गळफास घेऊन आत्महत्या केली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रंगपंचमीच्या दिवशी मुले घराबाहेर पडताच ठेकेदाराने हे भयंकर कृत्य केलं. गेल्या अनेक दिवसापासून पतीला पत्नीच्या चारित्र्यावर संशय होता. यावरून दोघांमध्ये बऱ्याचदा वाद देखील व्हायचे. त्याचवेळी पोलिसांना घटनास्थळावरून एक सुसाईड नोटही सापडली. त्यात असं लिहंल आहे की,‘मी माझ्या पत्नीची हत्या करून आत्महत्या करत आहे.’त्यामुळे पतीने आधीच पत्नीची हत्या करण्याचं ठरवलं असल्याचं या सुसाइड नोटवरुन स्पष्ट होत आहे.

वास्तविक, रंजीत हा बांधकाम कंत्राटदार होता. रंजीतने पत्नी संतोषी बाई हिचा चार्जर केबलने गळा आवळून खून केला आणि नंतर गळफास घेऊन आत्महत्या केली. दरम्यान, या सगळ्या घटनेच्या वेळी मुलगा सौरभ (वय14 वर्ष) आणि मुलगी निधी (वय 10 वर्ष) ही दोन्ही मुलं रंगपंचमीच्या दिवशी घराबाहेर होळी खेळत होती.

तेव्हाच या सगळा प्रकार घडला. जेव्हा मुलं घरी परतली तेव्हा त्यांना आतील दृश्य पाहून धक्काच बसला. कारण एकीकडे त्यांची आई निपचित अवस्थेत पडली होती तर दुसरीकडे वडील गळफास घेतलेल्या अवस्थेत होते. त्यामुळे मुलांनी तात्काळ आजूबाजूच्या लोकांना याबाबतची माहिती दिली.

हे वाचलं का?

    follow whatsapp