Jaya Bachchan: ‘मी शाप देते.. तुमचे ‘बुरे दिन’ येतील’, जया बच्चन भर सभागृहात एवढ्या का संतापल्या?
नवी दिल्ली: राज्यसभेत अंमली पदार्थ आणि सायकोट्रॉपिक पदार्थ (सुधारणा) विधेयक, 2021 वर चर्चा सुरु होती. या चर्चेत अनेक खासदार सत्ताधारी पक्षावर संतापल्याचे दिसून आले. आधी दिग्विजय सिंह यांनी सरकारवर आरोप केले, त्यानंतर समाजावदी पक्षाच्या राज्यसभेच्या खासदार जया बच्चन यांनी सरकारवर प्रचंड राग व्यक्त केला आहे. सरकारला ‘बुरे दिन’ येतील असा शापही त्यांनी यावेळी दिला. जया […]
ADVERTISEMENT
नवी दिल्ली: राज्यसभेत अंमली पदार्थ आणि सायकोट्रॉपिक पदार्थ (सुधारणा) विधेयक, 2021 वर चर्चा सुरु होती. या चर्चेत अनेक खासदार सत्ताधारी पक्षावर संतापल्याचे दिसून आले. आधी दिग्विजय सिंह यांनी सरकारवर आरोप केले, त्यानंतर समाजावदी पक्षाच्या राज्यसभेच्या खासदार जया बच्चन यांनी सरकारवर प्रचंड राग व्यक्त केला आहे. सरकारला ‘बुरे दिन’ येतील असा शापही त्यांनी यावेळी दिला.
ADVERTISEMENT
जया बच्चन यांना नार्कोटिक ड्रग्ज अँड सायकोट्रॉपिक सबस्टन्सेस (सुधारणा) विधेयक 2021 वर चर्चा करण्यासाठी बोलावण्यात आले, तेव्हा सुरुवातीलाच त्या म्हणाल्या की, ‘मला तुमचे आभार मानायचे नाहीत. कारण आपण जेव्हा या बाजूला होतात तेव्हा ओरडत-ओरडत तुम्ही वेलमध्ये जात असत. मी ती वेळ आठवावी की आज तुम्ही खुर्चीवर बसलात ती वेळ आठवावी? असा मला प्रश्न पडला आहे.’
जया बच्चन यांच्या या बोलण्यावर भाजप खासदार राकेश सिन्हा यांनी त्यांच्यावर संसदेची प्रतिष्ठा कमी केल्याचा आरोप केला. त्यांनी संसदेच्या अध्यक्षांना वैयक्तिकरित्या संबोधित केल्याचा आरोपही केला. ‘संसेदत अशा प्रकारची वागणूक योग्य नाही, त्यामुळे संसदेच्या प्रतिष्ठेला धक्का पोहोचला आहे. असे ते म्हणाले. खुर्चीचा असा अपमान कोणी करू शकत नाही.’ असं ते म्हणाले.
हे वाचलं का?
त्यावेळी भुवनेश्वर कलिता हे सभापतीच्या खुर्चीवर बसले होते. त्यांनी जया बच्चन यांना सन्माननीय सदस्य म्हणून बोलावून त्यांचा मुद्दा पुन्हा सांगण्यास सांगितले.
यावर जया बच्चन म्हणाल्या- ‘धन्यवाद तुम्ही मला आदरणीय म्हटले, पण जर तुम्ही मला खरोखर सन्माननीय मानत असाल तर माझे लक्षपूर्वक ऐका. आम्हाला न्याय हवा आहे. आम्ही त्यांच्याकडून (सरकार) न्यायाची अपेक्षा करू शकत नाही, परंतु आम्ही तुमच्याकडून न्यायाची अपेक्षा करू शकतो ना? सभागृहातील सदस्य आणि बाहेर बसलेल्या 12 सदस्यांसाठी तुम्ही काय करत आहात?’ असा सवाल यावेळी जया बच्चन यांनी विचारला.
ADVERTISEMENT
‘तुमचे ‘बुरे दिन’ लवकरच येतील’
ADVERTISEMENT
आपल्याला अंमली पदार्थांच्या विधेयकावर बोलायचं आहे, याची आठवण त्यांना सातत्याने करून दिली जात होती. जया बच्चन अध्यक्षस्थानी भुवनेश्वर कलिता यांना म्हणाल्या, ‘तुम्ही बोलू नका, ही माझी बोलण्याची वेळ आहे. तुम्ही का बोलत आहात? आमच्याकडे चर्चा करण्यासाठी इतके मोठे मुद्दे आहेत, परंतु आम्ही येथे 3-4 तास दिले आहेत. केवळ कारकुनी त्रुटीवर चर्चा करण्यासाठी. हे काय होत आहे?’
‘हे लाजिरवाणे आहे. त्या बाकी खासदारांना उद्देशून म्हणाल्या की, तुम्ही कोणाच्या समोर बीन वाजवत आहात?… हे बघा तुमचे ‘बुरे दिन’ लवकरच येणार आहेत. तुमची वृत्ती अशीच राहिली तर तुमचे बुरे दिन लवकरच येतील.’ असं म्हणत जया बच्चन यांनी सरकारला एक प्रकारे शापच दिला,.
यावेळी पुन्हा एकदा जया बच्चन यांना थांबविण्यात आलं. त्यावेळी जया बच्चन अधिकच संतापल्या आणि म्हणाल्या, ‘तुम्ही आम्हाला बोलूच देऊ नका, सभागृहातही बसू देऊ नका, आमच्या लोकांचा गळा दाबून टाका.’ असं म्हणत त्यांनी आपला संताप व्यक्त केला.
‘मी शाप देते…’
यावर एका सदस्याने त्यांच्यावर वैयक्तिक टिप्पणी केली, ज्यामुळे जया बच्चन अधिकच भडकल्या आणि म्हणाल्या, ‘या व्यक्तीवर कारवाई झाली पाहिजे. कोणी एखाद्याबद्दल वैयक्तिक टिप्पणी कशी करू शकते? आपल्या सहकाऱ्यांबद्दल आणि बाहेर बसलेल्या खासदारांबद्दल कुणाच्याही मनात आदर नाही. तुम्हाला ‘बुरे दिन’ येतील. मी शाप देते.’ या संपूर्ण प्रकारानंतर सभागृहाचे कामकाज तहकूब करण्यात आले.
पनामा पेपर लीक प्रकरणी ईडीने ऐश्वर्या रायला विचारले ‘हे’ प्रश्न
सभागृहातून बाहेर पडताना जया बच्चन म्हणाल्या, ‘मला कोणावरही वैयक्तिक टिप्पणी करायची नाही. जे काही घडले ते दुर्दैवी होते. त्याने असे बोलायला नको होते. मला याचा खूप त्रास झाला आहे.’ असंही त्या म्हणाल्या.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT