के.पी. गोसावींनी केलेल्या सगळ्या आरोपांचे माझ्याकडे पुरावे-प्रभाकर साईल

मुंबई तक

के. पी. गोसावी यांनी माझ्या विरोधात केलेल्या आरोपांबाबत माझ्याकडे सगळे पुरावे आहेत असं आता प्रभाकर साईल यांनी आता म्हटलं आहे. मला बदनाम करण्याचा डाव आता सुरू आहे कारण के. पी. गोसावी आणि इतर लोकांचे सगळ्या गोष्टी मी समोर आणल्या त्यामुळे मला बदनाम केलं जातं आहे असंही साईल यांनी म्हटलं आहे. काही वेळापूर्वी झालेल्या पत्रकार परिषदेत […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
Google CTA

के. पी. गोसावी यांनी माझ्या विरोधात केलेल्या आरोपांबाबत माझ्याकडे सगळे पुरावे आहेत असं आता प्रभाकर साईल यांनी आता म्हटलं आहे. मला बदनाम करण्याचा डाव आता सुरू आहे कारण के. पी. गोसावी आणि इतर लोकांचे सगळ्या गोष्टी मी समोर आणल्या त्यामुळे मला बदनाम केलं जातं आहे असंही साईल यांनी म्हटलं आहे. काही वेळापूर्वी झालेल्या पत्रकार परिषदेत प्रभाकर साईल यांनी हे वक्तव्य केलं आहे. प्रभाकर साईल यांनी मीडिया समोर आल्यानंतर जे आरोप केले होते ते के. पी. गोसावी यांनी खोडले होते. आता त्यानंतर आज पुन्हा एकदा प्रभाकर साईल यांनी पत्रकार परिषद घेतली आहे.

मी कोणत्याही दबावाखाली किंवा पैशांसाठी हे वक्तव्य करत नसल्याचंही प्रभाकर साईल यांनी म्हटलं आहे. तसंच आज संध्याकाळी सहा वाजता सविस्तर भूमिका मांडणार असल्याचंही त्यांनी सांगितलं आहे. प्रभाकर साईल यांनी सहार पोलीस ठाण्यात तक्रारही दाखल केली आहे. एवढंच नाही तर मी पैशांसाठी काहीही करत नाही असंही त्यांनी स्पष्ट केलं.

माझे कोणत्याही नेत्याशी काहीही संबंध नाहीत. मी फक्त माझ्या कामाशी प्रामाणिक राहणारा माणूस आहे. मला नाहक बदनाम केलं जातं आहे असंही प्रभाकरने म्हटलं आहे. तसंच मी आज संध्याकाळी सहा वाजता तुमच्या सगळ्यांशी सविस्तर बोलणार आहे. तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं देणार आहे असंही प्रभाकरने म्हटलं आहे. मी 22 जुलैला के. पी. गोसावी यांच्याकडे कामाला लागलो. तेव्हापासून आत्तापर्यंत त्यांनी मला 18 हजार रूपये दिले आहेत. पाच हजार रूपये माझ्या मुलीच्या वाढदिवसाला. त्यानंतर दुसऱ्या दिवशी दहा हजार आणि माझ्या पत्नीचा वाढदिवस असताना तिच्या अकाऊंटला गिफ्ट म्हणून दिलेले तीन हजार असे अठरा हजार रूपये त्यांनी मला आत्तापर्यंत दिले आहेत. बाकी माझी सॅलरीही पूर्ण दिलेली नाही असंही साईल यांनी म्हटलं आहे.