Sharad Pawar: ‘जात यावर मी कधीही राजकारण केलं नाही, पण…’, ‘त्या’ दाखल्यावर पवारांचं मोठं विधान
Sharad Pawar School Certificate: शरद पवार यांचा शाळेचा दाखला सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. त्याबाबत आता स्वत: पवारांनी स्पष्टीकरण दिलं आहे.
ADVERTISEMENT
Sharad Pawar Baramati Diwali 2023: बारामती: राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) हे ओबीसी असल्याचा दाखला हा सोशल मीडियावर गेल्या दोन दिवसापासून व्हायरल केला जात आहे. मात्र, हा दाखला खोटा असल्याचा दावा सुप्रिया सुळे, जयंत पाटील यांनी केला आहे. मात्र, आता स्वत: शरद पवारांनी याबाबत वक्तव्य केलं आहे. यावेळी शरद पवार असंही म्हणाले की, ‘जात यावर समाजकारण, राजकारण हे मी कधी केलं नाही..’ त्यामुळे व्हायरल होत असलेला दाखला खोटा असल्याचं पवारांनी देखील सांगितलं. ते बारामतीत बोलत होते. (i have never played politics on caste sharad pawar clarified on the viral school certificate baramati govind baug diwali 2023 maratha reservation)
ADVERTISEMENT
बारामतीमध्ये दरवर्षी शरद पवार हे आपल्या गोविंदबागेत दिवाळी पाडव्यानिमित्त आपल्या कार्यकर्त्यांची जाहीर भेट घेत असतात. पण यंदाची दिवाळी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांसाठी महत्त्वाची ठरत आहे. कारण राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर दिवाळी पाडव्याला अजित पवार आणि शरद पवार एकत्र येणार का? याविषयी जोरदार चर्चा रंगली होती. पण यावेळी फक्त शरद पवार हेच कार्यक्रमाला उपस्थित होते.
हे ही वाचा>> ‘शरद पवारांच्या शाळेच्या दाखल्यावर…’, स्पष्टीकरण देत जयंत पाटलांची नामदेव जाधवांवर टीका
याच कार्यक्रमानंतर शरद पवारांनी माध्यमांशी संवाद साधला. त्याचवेळी त्यांना व्हायरल दाखल्यावर देखील प्रतिक्रिया दिली. पाहा त्यावेळी शरद पवार नेमकं काय म्हणाले.
हे वाचलं का?
‘जात यावर मी राजकारण कधी केलं नाही.. करणार नाही..’
‘असं आहे की, तो दाखला मी बघितला. महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचं जे हायस्कूल आहे त्या हायस्कूलला मी होतो.. त्याचा तो दाखला आहे. तो दाखला खरा आहे. त्यामध्ये जात, धर्म हा खरा आहे. पण काही लोकांनी दुसरा काही तरी दाखला फिरवला इंग्रजीमध्ये.. त्यामध्ये माझ्यापुढे ओबीसी लिहलं.’
‘ओबीसी समाजाबाबत आदर, आस्था माझ्या मनात आहे. पण जन्माने जी प्रत्येकाची जात असते ती मी लपवू इच्छित नाही. सगळ्या जगाला माहिती आहे की, माझी जात कोणती आहे ते. पण जात यावर समाजकारण, राजकारण हे मी कधी केलं नाही.. करणार नाही..’
हे ही वाचा>> OBC नोंद असलेला शरद पवारांचा दाखला व्हायरल, सुप्रिया सुळे काय म्हणाल्या?
‘मात्र, त्या वर्गाचे प्रश्न आहेत ते सोडविण्यासाठी जो काही हातभार लावावा लागेल तो माझ्याकडून लावला जाईल.’ असं म्हणत शरद पवार यांनी त्यांच्या दाखल्याबाबत भाष्य केलं.
‘मुख्यमंत्र्यांकडून लवकर निर्णय येईल आणि..’
‘मुख्यमंत्र्यांनी एक बैठक बोलावली होती. त्या बैठकीला मलाही निमंत्रण होतं.. ही जी बैठक झाली त्याला राज्यातील विविध पक्षाचे प्रमुख नेते होते. त्या बैठकीत मुख्यमंत्र्यांनी जी अपेक्षा आहे त्याची पूर्तता करण्याची भूमिका मांडली. त्यासंबंधीचं पाऊल टाकतोय असं सांगितलं. आता तो निर्णय त्यांच्याकडून लवकर आला तर वातावरण सुधारेल.’ असंही शरद पवार हे मराठा आरक्षणाबाबत म्हणाले.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT