गोसावींना क्रूझ छाप्याच्या आधी भेटलो होतो, समीर वानखेडे खूप चांगले अधिकारी-मनिष भानुशाली

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

2 ऑक्टोबरला कॉर्डिलिया क्रूझवर एनसीबीने छापा टाकला आणि कारवाई केली. त्यानंतर आता आर्यन खानसह एकूण आठ जणांना अटक करण्यात आली. गेल्या 23 दिवसांपासून हा मुद्दा गाजतो आहे. आर्यन खानचा जामीन चारवेळा फेटाळण्यात आला आहे. अशात त्याला जामीन मिळेल की नाही हा प्रश्न असतानाच या प्रकरणाला रविवारी जबदस्त कलाटणी मिळाली. के. पी गोसावी, समीर वानखेडे यांच्यावर प्रभाकर साईल या साक्षीदाराने गंभीर आरोप केले आहेत. ज्यानंतर आता मनिष भानुशाली यांनी समोर येत काही बाबी स्पष्ट केल्या आहेत.

ADVERTISEMENT

Exclusive : मी समीर वानखेडेंना ओळखत नाही, त्यांना टीव्हीवर पाहिलं आहे-के.पी. गोसावी

एनसीबीने त्यांच्या अहवालात ज्या साक्षीदाराचा उल्लेख साक्षीदार क्रमांक एक असा केला आहे. तो साक्षीदार म्हणजे प्रभाकर साईल. प्रभाकर साईलने रविवारी मीडियासमोर येत या प्रकरणातले साक्षीदार के. पी. गोसावी यांनी आर्यन खानला सोडवण्याच्या बदल्यात शाहरुखच्या मॅनेजरकडे 25 कोटींची खंडणी मागितल्याचा आरोप केला. तसंच यातले आठ कोटी समीर वानखेडेंना मिळणार होते असंही वक्तव्य केलं. आता यानंतर आज के. पी. गोसावी यांनी फोनवरून इंडिया टुडेशी संवाद साधला आणि सगळे आरोप फेटाळले. आता त्या पाठोपाठ या प्रकरणातले दुसरे साक्षीदार मनिष भानुशालीही समोर आले आहेत.

हे वाचलं का?

आर्यन खानने तुरुंगात वाचण्यासाठी मागवलं राम-सीतेवरचं पुस्तक

काय म्हटलं आहे मनिष भानुशाली यांनी इंडिया टुडेशी बोलताना?

ADVERTISEMENT

क्रूझ प्रकरणात मी साक्षीदार आहे, मी किरण गोसावींना छापा पडण्याच्या तीन-चार दिवस आधी भेटलो होतो. आम्ही दोघे एनसीबी कार्यालयात गेलो तिथे अशी पार्टी होणार आहे ही माहिती दिली. छापा पडला तेव्हा तिथे सॅम डिसूझाही होता. मात्र तो छाप्यात सहभागी नव्हता.

ADVERTISEMENT

मी पंचनाम्यावर साक्षीदार म्हणून सही केली आहे. किरण गोसावी यांच्या बॉडीगार्डला बळजबरीने सही करायला लावली का? कोऱ्या कागदावर सह्या घेतल्या होत्या का? याची मला कल्पना नाही. किरण गोसावी यांच्यासोबत मी छाप्यांच्या नंतर बोललो नाही. सध्या या सगळ्या प्रकरणाला राजकीय वळण लागलं आहे. मागच्या वीस दिवसांपासून मी समोर आलं नाही कारण मला जिवाचा धोका वाटत होता. समीर वानखेडे हे खूप चांगले अधिकारी आहेत असंही भानुशाली यांनी म्हटलं आहे.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT