देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांचा पहाटेचा शपथविधी पाहून मला धक्काच बसला होता-शरद पवार
महाराष्ट्राच्या राजकारणात नोव्हेंबर 2019 मध्ये जे घडलं ते इतक्यात कुणीही विसरण्यासारखं नाही. पुढची अनेक वर्षे ते लक्षात राहणार आहे. बरोबर आम्ही सांगत आहोत ते देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी घेतलेल्या पहाटेच्या शपथविधीबाबत. फक्त 72 तासांचं हे सरकार होतं. अनेकांना आश्चर्याचा धक्काच त्यामुळे बसला होता. मुंबई तकने याबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांना प्रश्न […]
ADVERTISEMENT

महाराष्ट्राच्या राजकारणात नोव्हेंबर 2019 मध्ये जे घडलं ते इतक्यात कुणीही विसरण्यासारखं नाही. पुढची अनेक वर्षे ते लक्षात राहणार आहे. बरोबर आम्ही सांगत आहोत ते देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी घेतलेल्या पहाटेच्या शपथविधीबाबत. फक्त 72 तासांचं हे सरकार होतं. अनेकांना आश्चर्याचा धक्काच त्यामुळे बसला होता. मुंबई तकने याबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांना प्रश्न विचारला. पहाटेचा शपथविधी पाहून ज्यांना धक्का बसला त्यामध्ये इतर अनेकांप्रमाणेच शरद पवारही होते. शरद पवारांनी महाराष्ट्राचं आणि देशाचं राजकारण, महाविकास आघाडी, पुलोदचं सरकार याबाबत मुंबई तकला सविस्तर मुलाखत दिली आहे.
पहाटेच्या शपथविधीबाबत काय म्हणाले शरद पवार?
शिवसेना आणि भाजप यांच्यात अंतर आहे हे आम्हाला दिसत होतं. एकीकडे शिवसेनेशी आणि काँग्रेसशी एकत्र येण्याबाबत बोलणी सुरू होती. त्यावेळीच एक निरोप आला होता की भाजपही सोबत येण्यास तयार आहे. जवळपास दीड महिना झाल्यानंतरही सरकार बनत नाही हे पाहून अनेक आमदार निराश झाले होते. आम्हाला काही जण सांगत होते काही करून सरकार स्थापन करा. भाजपही तयार आहे त्याचा विचार करा असं काही जणांनी सुचवलं.
मात्र भाजपला दूर ठेवायचं असल्याने आम्ही हा विचार मानला नाही. अजित पवार त्यावेळी एक बैठक झाली त्यामध्ये वैतागले होते. तुम्ही म्हणता तसं असं अजित पवार म्हणाले आणि त्यानंतर दुसऱ्या दिवशी पहाटे देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांचा शपथविधी झाला. पहाटे जो शपथविधी झाला त्याबद्दल आम्हाला कुणालाच काहीही माहित नव्हतं. मी सुद्धा झोपेतच होतो, मला उठवलं आणि सांगितलं गेलं जे ऐकून मला धक्काच बसला.










