Mahindra: ‘मी कधीही सर्वात श्रीमंत होणार नाही..’, उद्योगपती आनंद महिंद्रा असं का म्हणाले?

मुंबई तक

Anand Mahindra Tweet: मुंबई: महिंद्रा अँड महिंद्राचे अध्यक्ष (Mahindra & Mahindra Chairman) आणि देशातील सुप्रसिद्ध उद्योगपती आनंद महिंद्रा (Anand Mahindra) यांचे एक ट्विट वेगाने व्हायरल होत आहे. यामध्ये त्यांनी असं काही लिहलं आहे की, ज्यावर सोशल मीडियावर चर्चा सुरू झाली आहे. वास्तविक, त्यांच्या ट्विटर हँडलवरून एक ट्विट रिट्विट करत त्यांनी लिहिले की, ‘मी कधीच सर्वात […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

Anand Mahindra Tweet: मुंबई: महिंद्रा अँड महिंद्राचे अध्यक्ष (Mahindra & Mahindra Chairman) आणि देशातील सुप्रसिद्ध उद्योगपती आनंद महिंद्रा (Anand Mahindra) यांचे एक ट्विट वेगाने व्हायरल होत आहे. यामध्ये त्यांनी असं काही लिहलं आहे की, ज्यावर सोशल मीडियावर चर्चा सुरू झाली आहे. वास्तविक, त्यांच्या ट्विटर हँडलवरून एक ट्विट रिट्विट करत त्यांनी लिहिले की, ‘मी कधीच सर्वात श्रीमंत होणार नाही…’ त्यांनी असं का म्हटलं? याचा खुलासा देखील आनंद महिंद्रा यांनी केला आहे. (i will never become the richest said anand mahindra also gave the reason)

ट्विटर युजरने विचारलेला एक सवाल…

सोशल मीडियावर (Social Media) खूप सक्रिय असलेल्या महिंद्रा ग्रुपचे चेअरमन आनंद महिंद्रा यांना एका ट्विटर यूजरने मोठा प्रश्न विचारला होता, ज्यावर त्यांनी मजेशीर उत्तर दिले आहे. वास्तविक, विक्रांत सिंह नावाच्या या युजरने महिंद्रा यांना विचारले होते की, देशातील श्रीमंतांच्या यादीत तुम्ही 73व्या क्रमांकावर आहात तुम्ही पहिल्या क्रमांकावर कधी येणार? या ट्विटवर आनंद महिंद्रा यांनी हिंदीत ट्विट करताना आपल्या मनातील गोष्ट सांगितली. जे वाचून तुम्हीही थक्क व्हाल.

रवीना टंडनने आनंद महिंद्रांना कॉलेज जीवनातील सांगितली ही खास आठवण; म्हणून घेणार महिंद्राची थार गाडी

आनंद महिंद्रा यांनी व्यक्त केली आपली इच्छा

यूजरच्या प्रश्नाला उत्तर देताना आनंद महिंद्रा यांनी त्यांच्या ट्विटमध्ये लिहिले की, ‘सत्य हे आहे की मी कधीच सर्वात श्रीमंत होणार नाही… कारण ही माझी इच्छा कधीच नव्हती…’ त्यांचे हे ट्विट मोठ्या प्रमाणात व्हायरल (Viral Tweet) होत आहे आणि लोक त्यावर प्रचंड प्रतिक्रिया देत आहेत. त्यांच्या ट्विटला आतापर्यंत सुमारे 18,000 हजाराहून लाईक्स मिळाले होते आणि शेकडो लोकांनी ते रिट्विट केले आहे.

हे वाचलं का?

    follow whatsapp