Rain alert : पुणे, नाशिकसह विदर्भाला ‘यलो अलर्ट’; पुढील पाच दिवस मुसळधार

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

काही दिवस विश्रांती घेतल्यानंतर राज्यात पाऊस पुन्हा सक्रिय झाला आहे. पुढील पाच दिवस राज्यातील विविध ठिकाणी मुसळधार पाऊस कोसळणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. पुणे, नाशिकसह संपूर्ण विदर्भाला यलो अलर्टचा इशारा देण्यात आला आहे.

ADVERTISEMENT

राज्यात ठिकठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस कोसळत आहे. दरम्यान, पुढील पाच दिवसांत पावसाचा जोर वाढणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. विशेषतः विदर्भातील सर्व जिल्हे आणि पालघर, ठाणे, रायगड, पुणे, नाशिकसह विदर्भातील सर्वच जिल्ह्यांना यलो अलर्टचा इशारा देण्यात आला आहे.

कोणत्या दिवशी कोणत्या जिल्ह्यांना अलर्ट

हे वाचलं का?

२८ ऑगस्ट रोजी ११ जिल्ह्यांना इशारा

बुलढाणा, अकोला, अमरावती, वाशिम, यवतमाळ, वर्धा, चंद्रपूर, गढचिरोली, गोंदिया, भंडारा, नागपूर.

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

२९ ऑगस्ट १३ जिल्ह्यांना इशारा

बुलढाणा, अकोला, अमरावती, वाशिम, यवतमाळ, वर्धा, चंद्रपूर, गढचिरोली, गोंदिया, भंडारा, नागपूर आणि मराठवाड्यातील उस्मानाबाद व लातूर.

३० ऑगस्ट रोजी १५ जिल्ह्यांना यलो अलर्ट

बुलढाणा, अकोला, अमरावती, वाशिम, यवतमाळ, वर्धा, चंद्रपूर, गढचिरोली, गोंदिया, भंडारा, नागपूर आणि मराठवाड्यातील परभणी, नांदेड, हिंगोली, लातूर.

३१ ऑगस्ट रोजी १६ जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा

बुलढाणा, अकोला, अमरावती, वाशिम, यवतमाळ, वर्धा, चंद्रपूर, गढचिरोली, गोंदिया, भंडारा, नागपूरसह नाशिक, पालघर, ठाणे, रायगड व पुणे या जिल्ह्यांसाठी यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.

हवामान विभागाच्या अंदाजाप्रमाणे यलो अलर्ट देण्यात आलेल्या जिल्ह्यांशिवाय इतर जिल्ह्यात हवामान नेहमीप्रमाणे असेन. हवामान विभागाच्या अंदाजनुसार पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह पाऊस कोसळण्याची शक्यता आहे.

जुलैच्या अखेरीस राज्याच्या काही भागात मुसळधार पाऊस झाल्यानं शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला होता. मात्र, पुन्हा गेल्या दहा पंधरा दिवसांपासून पावसानं राज्यात विश्रांती घेतली आहे. आता जमिनीतील ओलावा कमी होत असून, पिकांना पाण्याची गरज निर्माण झाली आहे. त्यामुळे शेतकरी दमदार पावसाची प्रतीक्षा करत आहे.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT