Rain Alert : तीन दिवस काळजीचे! विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाचा इशारा

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

गुलाब चक्रीवादळामुळे अतिवृष्टीच्या तडाख्यातून सावरत असलेल्या राज्यातील काही भागांवर पुन्हा पावसाचं संकट ओढवण्याची शक्यता आहे. तसा इशारा हवामान विभागाने दिला आहे. राज्यात पुढील तीन दिवस विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. नागरिकांनी घराबाहेर जाण्याचं टाळावं, असं आवाहनही हवामान विभागानं केलं आहे.

राज्यात आजपासून पुढील तीन ते चार दिवस ढगांच्या गडगडाटासह आणि विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस कोसळणार असल्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. राज्यातील दोन-चार जिल्हे वगळता संपूर्ण महाराष्ट्रासाठी यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. हवामान विभागाने व्यक्त केलेल्या अंदाजानुसार आज मुंबई, पालघर, ठाणे लातूर, नांदेड, नंदुरबार राज्याच्या उर्वरित भागात मुसळधार पाऊस होऊ शकतो.

हवामान विभागाच्या प्रादेशिक केंद्राचे प्रमुख के. एस. होसाळीकर यांनी ट्वीट करून हवामानात होणाऱ्या बदलांबद्दलची माहिती दिली आहे. ‘पुढच्या 4 ते 5 दिवसांत राज्यात काही ठिकाणी विजांच्या गडगडाटासह जोरदार पावसाची शक्यता आहे. कृपया विजा चमकताना घराबाहेर पडू नका, त्यात जीवाला धोका असू शकतो. शक्यतो अशा प्रकारचे तीव्र हवामान दुपार नंतर, ‌संध्याकाळी व रात्रीपर्यंत असते’, अशी माहिती देत त्यांनी नागरिकांना काळजी घेण्याचं आवाहन केलं आहे.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

उद्या कोणत्या जिल्ह्यात असेल पाऊस?

हवामान विभागाच्या माहितीप्रमाणे उद्या (6 ऑक्टोबर) ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, नाशिक, अहमदनगर, औरंगाबाद, बीड, परभणी, उस्मानाबाद, लातूर, नांदेड जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. यलो अलर्टही जारी करण्यात आला आहे.

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

7 ऑक्टोबरला काय आहे पावसाचा अंदाज?

गुरुवारी (7 ऑक्टोबर) पावसाची व्याप्ती वाढणार आहे. मुंबई, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, नंदुरबार, धुळे, नाशिक, अहमदनगर, औरंगाबाद, बीड, जालना, उस्मानाबाद, लातूर, नांदेड, परभणी हिंगोली या जिल्ह्यात मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

राज्यातील काही भागात 8 ऑक्टोबरला पावसाचा जोर कायम राहणार आहे. मुंबई, पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी, पुणे, सातारा, नंदुरबार, धुळे, नाशिक, अहमदनगर, जळगाव, औरंगाबाद, जालना, बीड, उस्मानाबाद, परभणी, हिंगोली, लातूर, नांदेड या जिल्ह्यांना विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT