‘सुभाष देसाईंनी 1000 कोटींचा घोटाळा केला’ जलीलांच्या आरोपाने खळबळ

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

एमआयएमचे औरंगाबादचे खासदार इम्तियाज जलील यांनी माजी मंत्री सुभाष देसाईंवर गंभीर आरोप केले आहे. देसाई यांनी उद्योगमंत्री असताना 1000 कोटींचा घोटाळा केला असल्याचा दावा खा. जलील यांनी केला आहे. त्यामुळं सर्वांचेच भुवया उंचावल्या आहेत. इम्तियाज जलील यांनी बुधवारी औरंगाबाद येथे पत्रकार परिषद घेऊन ही माहिती दिली आहे. तसंच या संपूर्ण प्रकरणाची समितीमार्फत चौकशी व्हावी, अशी मागणी देखील जलील यांनी केली आहे.

ADVERTISEMENT

काय आहे आरोप?

राज्याचे तत्कालीन उद्योग मंत्री तथा औरंगाबादचे पालकमंत्री सुभाष देसाई यांनी इंडस्ट्रियल प्लॉटचे कन्वर्जन करून अनेक बिल्डरांकडून कोट्यावधी रुपये घेऊन प्लॉट नियमबाह्य पद्धतीने दिले आहेत, असा गंभीर आरोप जलील यांनी केला आहे. या सर्व प्रकरणामध्ये देसाई यांचा मुलगा बिल्डरांशी संपर्क करून रेट ठरवित होता, असा देखील आरोप खासदार इम्तियाज जलील यांनी केला असून हा घोटाळा सुमारे 1000 कोटीच्या घरात आहे, असं त्यांचं म्हणणं आहे.

सुभाष देसाईंनी आपल्या पदाचा गैरवापर करुन हा घोटाळा केला आहे, असं जलील यांचं म्हणणं आहे. उद्योगासाठी असेलल्या जमिनीला कमर्शिअल किंवा रेसिडंसी एरियामध्ये रुपांतरीत केली जायची. नंतर ती जमीन बिल्डरला ठरवलेल्या रकमेत दिली जायची. संपूर्ण महाराष्ट्रातील इंडस्ट्रियल एरियामध्ये असं करुन मागच्या 15 वर्षात 1 हजार कोटीपेक्षा जास्त अपहार केल्याचं जलील यांचं म्हणणं आहे. तसंच या सर्व प्रक्रियेमध्ये त्यांचा मुलगा सक्रिय होता, जो प्लॉटची रक्कम ठरवायचा, असं देखील जलील म्हणाले.

हे वाचलं का?

घोटाळ्यांचे आरोप

सध्या आधिवेशनात एकामागं एक आजी मंत्र्यांवर घोटाळ्यांचे आरोप केले जात आहेत. ज्यामध्ये स्व:ता एकनाथ शिंदे, अब्दुल सत्तार, शंभूराज देसाई यांच्यावर घोटाळ्याचे आरोप झाले आहे. यासर्व घडामोडींमध्ये आता उद्धव ठाकरे यांच्या पक्षातली नेते आणि माजी मंत्री यांच्यावर घोटाळ्यांचा आरोप लागला आहे. एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणात लक्ष घालून चौकशी समिती नेमावी अशी मागणी खासदार इम्तियाज जलील यांनी केली आहे.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT