मुख्यमंत्री महाराष्ट्राशी संवाद साधत होते आणि बुलढाण्यात सैलानी बाबांच्या संदलला झाली तुफान गर्दी
एकीकडे मुख्यमंत्री महाराष्ट्राशी संवाद साधत होते त्याचवेळी बुलढाण्यात सैलानी बाबांच्या संदलला तुफान गर्दी झाल्याचं चित्र महाराष्ट्रात पाहण्यास मिळालं. सैलानी बाबांच्या संदलसाठी जमलेली गर्दी प्रचंड मोठ्या प्रमाणावर होती. महाराष्ट्रातील बुलढाणा जिल्ह्यात सैलानी बाबांचा दर्गा आहे. या ठिकाणी दर वर्षी यात्रा आणि उत्सव असतो ज्याला संदल असं म्हटलं जातं. गेल्या वर्षी हे संदल कोरोनामुळे रद्द करण्यात आलं […]
ADVERTISEMENT
एकीकडे मुख्यमंत्री महाराष्ट्राशी संवाद साधत होते त्याचवेळी बुलढाण्यात सैलानी बाबांच्या संदलला तुफान गर्दी झाल्याचं चित्र महाराष्ट्रात पाहण्यास मिळालं. सैलानी बाबांच्या संदलसाठी जमलेली गर्दी प्रचंड मोठ्या प्रमाणावर होती. महाराष्ट्रातील बुलढाणा जिल्ह्यात सैलानी बाबांचा दर्गा आहे. या ठिकाणी दर वर्षी यात्रा आणि उत्सव असतो ज्याला संदल असं म्हटलं जातं. गेल्या वर्षी हे संदल कोरोनामुळे रद्द करण्यात आलं होतं. कोरोना रूग्णांची संख्या वाढू लागल्याने यावर्षीही जिल्हा प्रशासनाने संदलला दहा लोकांच्या उपस्थितीत परवानगी दिली होती. मात्र सगळ्या नियमांना हरताळ फासून संदल साजरा करण्यात आला ज्यासाठी हजारो लोकांची गर्दी झाली होती.
ADVERTISEMENT
एकीकडे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री हे जनतेशी संवाद साधत होते. आपल्याला लॉकडाऊनबाबत कठोर निर्णय घ्यावा लागेल हेदेखील त्यांनी सांगितलं त्यांनी लॉकडाऊनची घोषणा केली नाही. मात्र महाराष्ट्रातली परिस्थिती काय आहे ते सांगितलं तसंच अशाच पद्धतीने रूग्ण वाढत राहिले तर काही दिवसातच उभी केलेली आरोग्य व्यवस्थाही अपुरी पडू लागेल असंही ते म्हणाले. मुख्यमंत्री एकीकडे काळजी घेण्याचं, मास्क लावण्याचं, अंतर पाळण्याचं, कोरोनाला प्रतिबंध करण्यासाठी सगळ्यांनी एकत्र येण्याचं आवाहन करत होते आणि दुसरीकडे बुलढाण्यात सैलानी बाबांच्या संदलसाठी मोठी गर्दी झालेली पाहण्यास मिळाली.
हे वाचलं का?
महत्त्वाची बाब ही की सैलानीबाबांच्या संदलसाठी दहा लोकांच्या उपस्थितीची संमती दिली होती. तसंच लिखित स्वरूपात त्यांनी सांगितलंही होतं. मात्र रात्री ८ वाजता सैलानी बाबांच्या संदलसाठी मोठ्या प्रमाणावर गर्दी झाली होती. या गर्दीत मास्क घालणाऱ्या व्यक्तीला शोधणं कठीण आहे. सोशल डिस्टन्सिंगचे सगळे नियम पायदळी तुडवले गेले. बुलढाण्यात अॅक्टिव्ह कोरोना रूग्णांची संख्या ६ हजारांच्या जवळपास आहे. तर आत्तापर्यंत २७४ जणांचा मृत्यू झाला आहे. बुलढण्याचे तहसीलदार रूपेश खंडारे यांनी सांगितलं आहे की, संदल आयोजित करणाऱ्या १० ते १२ लोकांसहीत १ हजार अज्ञात लोकांवर गुन्हा दाखल करण्यात येणार आहे.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT