Crime : शारीरिक संबंधांसाठी पत्नीचा नकार; नशेत पतीनं केलं भयंकर कृत्य

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

Crime | Husband kills her Wife :

ADVERTISEMENT

सारंगढ : छत्तीसगडमधील सारंगढ-बिलाईगड जिल्ह्यात एक धक्कादायक घटना घडली आहे. शारीरिक संबंधांसाठी पत्नीने नकार दिल्यानंतर पतीने दारुच्या नशेत तिच्यावर बलात्कार करुन जीव घेतल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या प्रकरणात पतीने गुन्हा लपविण्याचाही प्रयत्न केला. मात्र पोलिसांच्या खाक्यासमोर आपला गुन्हा मान्य केला. यानंतर पोलिसांनी आरोपी पतीला अटक करत त्याच्यावर भारतीय दंड विधान ३०२ आणि इतर कलमांनुसार गुन्हा दाखल केला आहे. (Disclosing the murder of a woman in Sarangarh-Bilaigarh district, the police arrested the accused husband)

नेमकं काय घडलं?

पोलीस अधीक्षक राजेश कुकरेजा यांनी दिलेल्या माहितीनुसार, पंचराम भोये याने होळीच्या दिवशी दारूच्या नशेत पत्नीसोबत शारीरिक संबंध ठेवण्याची इच्छा व्यक्त केली होती. पण, पत्नीने नकार दिला. यावरून दोघांमध्ये वाद सुरू झाला. यावेळी पतीने शेजारचं मडकं फेकून पत्नीच्या डोक्यावर मारलं. त्यामुळे तिला किरकोळ दुखापत झाली आणि ती पतीवर रागावून शेताकडे निघाली.

हे वाचलं का?

दारूच्या नशेत पतीही पत्नीच्या पाठोपाठ शेताकडे निघाला. वाटेत त्याने पत्नीशी बळजबरीने शारीरिक संबंध ठेवण्याचा प्रयत्न केला. यादरम्यान संतापलेल्या पत्नीने आरडाओरड सुरु केली. त्यामुळे त्याने पत्नीचे तोंड दाबले. यात गुदमरल्याने तिचा जागीच मृत्यू झाला. यानंतर पत्नी पूर्णपणे शांत झाल्याचं पाहून मृत पत्नीला जागीच सोडून तो शांतपणे घरी जाऊन झोपला.

दुसऱ्या दिवशी सकाळी मुलगा अशोकने वडिलांना आईबद्दल विचारलं असता, आई शेजारच्या किर्तनाला गेली असावी, असं सांगितलं. त्यानंतर आरोपीने फिल्मी स्टाईलने गुन्हा लपवण्याचा प्रयत्न केला. 9 मार्च रोजी सकाळी 6 वाजता आरोपी शेतात शौचासाठी गेला तेव्हा त्याने पत्नीचा मृतदेह पाहून आरडाओरड सुरू केली आणि घटनेची माहिती पोलिसांना दिली.

ADVERTISEMENT

Crime: मीरा रोड परिसर हादरला! चप्पलेवरून भांडण… शेजाऱ्याने जीवच घेतला

ADVERTISEMENT

पोलिसांची हुशारी :

घटनेची माहिती मिळताच पोलिलांनी घटनास्थळी धाव घेत, मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवून प्रकरणाचा तपास सुरू केला. घटनास्थळावरून पोलिसांना अनेक पुरावे मिळाले, त्यावरून ही हत्या असल्याची पोलिसांची खात्री पटली. चौकशीदरम्यान पोलिसांना पंचरामवर संशय आला. सुरुवातीला तो या मृत्यूमध्ये आपला हात असल्याचं नाकारत राहिला. मात्र, पोलिसांच्या खाक्यात पोपटासारखा बोलू लागला आणि पद्धतशीरपणे प्रकरणाचा खुलासा केला. यानंतर पोलिसांनी भादंवि कलम ३०२ आणि इतर कलमांखाली गुन्हा दाखल करून आरोपीला अटक करून न्यायालयात हजर केल्यानंतर त्याची कारागृहात रवानगी केली.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT