गडचिरोलीत अस्वलांच्या कळपाचा मजूर महिलांवर हल्ला, ४ महिला गंभीर जखमी
गडचिरोली जिल्ह्याचा कुरखेडा तालूक्यातील दादापूर येथील तेंदूपत्ता संकलनाकरीता गावाजवळ असलेल्या कोहका राऊंड कक्ष क्रमांक ४४७ अंतर्गत कवऱ्याल झट्यालच्या जंगलात गेलेल्या महिला मजुरांवर अस्वलांच्या कळपाने केलेल्या हल्ल्यात ४ महिला मजूर गंभीर जखमी झाल्याची घटणा आज शनिवार रोजी सकाळी ७ वाजेच्या सुमारास घडली आहे. Viral Video : टिपेश्वर अभयारण्यात जिप्सींनी अडवला वाघाचा रस्ता दादापूर येथील महिला – […]
ADVERTISEMENT
गडचिरोली जिल्ह्याचा कुरखेडा तालूक्यातील दादापूर येथील तेंदूपत्ता संकलनाकरीता गावाजवळ असलेल्या कोहका राऊंड कक्ष क्रमांक ४४७ अंतर्गत कवऱ्याल झट्यालच्या जंगलात गेलेल्या महिला मजुरांवर अस्वलांच्या कळपाने केलेल्या हल्ल्यात ४ महिला मजूर गंभीर जखमी झाल्याची घटणा आज शनिवार रोजी सकाळी ७ वाजेच्या सुमारास घडली आहे.
ADVERTISEMENT
Viral Video : टिपेश्वर अभयारण्यात जिप्सींनी अडवला वाघाचा रस्ता
दादापूर येथील महिला – पूरूष असा १४ मजूरांचा गट गावापासून ५ कीलोमीटर अंतरावर असलेल्या कवऱ्याल झट्याल जंगलात तेंदूपत्ता संकलनाकरीता आज पहाटेच गेला होता. तेंदू पत्ता गोळा करण्याचं काम सुरू असताना महिलांवर पाच अस्वलांच्या कळपाने हल्ला केला. या हल्ल्यात सीमा रतीराम टेकाम (वय-२१), लता जीवन मडावी (वय-३५), पल्लवी रमेश टेकाम (वय-२५) आणि रमशीला आनंदराव टेकाम (वय-३८) या चार महिला गंभीर जखमी झाल्या.
हे वाचलं का?
या वेळी घटना स्थळी असलेल्या सहकारी मजूर महिला शेवंता उसेंडी, रेशमा उसेंडी, निलीमा उसेंडी, सनया टेकाम यांनी आणि पुरूष मजूर आनंदराव मडवी, जीवन मडवी, रामचंद्र टेकाम, रतिराम टेकाम, आनंदराव टेकाम यांनी हो हल्ला केला आणि अस्वलांना पळवून लावलं. एकदम इतके आवाज आल्याने अस्वलांचा कळपाने पळ काढला. या घटनेची माहिती मिळताच हरीराम उसेंडी आणि माजी पंचायत समिती उपसभापति मनोज दूनेदार यांनी १०८ क्रमांकाचा रूणवाहिकेला फोन केला. त्यानंतर सगळ्या जखमींना येथील उपजिल्हा रूग्णालयात उपचारांसाठी दाखल केले.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
या घटनेची माहिती मिळताच रामगडचे वनरक्षक बि डी रामपूरकर, मालेवाडाचे वनरक्षक बाबूराव तुलावी, डी एम उईके यांनी रूग्णालयाला भेट देत जखमीची विचारपूस केली. त्यानंतर नियमाप्रमाणे उपचारार्थ आर्थिक मदत करण्याचे आश्वासन दिलं. घटनेसंदर्भात पूराडाचे वनपरिक्षेत्र अधिकारी बालाजी दिघोळे याना भ्रमनध्वनीवर माहिती देत मजुरांना तातडीने आर्थिक मदत देण्याची मागणी मनोज दूनेदार यानी केली आहे.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT