कोल्हापुरात दोन गटात तुफान हाणामारी, महिलांवरही तलवारीने हल्ला

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

दीपक सूर्यवंशी, कोल्हापूर: कोल्हापुरातील महाविद्यालय परिसरात झालेल्या वादाचे पडसाद अखेर वारे वसाहतीत उमटले. किरकोळ वादातून काल (5 फेब्रुवारी) दुपारी वारे वसाहतीतल्या 2 गटात झालेल्या सशस्त्र हल्ल्यात चौघे जण जखमी झाले आहेत. जखमींपैकी एका गटातील पृथ्वी आवळे हा तरुण गंभीर जखमी झाला आहे. त्याला पुढील उपचारासाठी खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. या हल्ल्यातील माने आणि कुरडे गटातील संशयितांचा जुना राजवाडा पोलिसांकडून शोध सुरू आहे.

ADVERTISEMENT

कोल्हापुरातील संभाजी नगर परिसरातील वारे वसाहत इथं राहणाऱ्या पृथ्वी आवळे आणि सुजल कांबळे या दोघांत काही कारणावरून 2 दिवसांपूर्वी वाद झाला होता. या वादाच्या ठिणगीनं पेट घेतला. पण शनिवारी आवळे आणि कांबळे यांच्यात पुन्हा वादावादीची घटना घडली.

हे प्रकरण सुरुवातीला पोलीस ठाण्यापर्यंत गेलं होतं. मात्र, दोन्ही गटात समेट झाल्यामुळे जुना राजवाडा पोलिसांनाही त्यांना सोडून दिलं होतं. मात्र त्यानंतर दुपारी तीन वाजता पुन्हा दोन्ही गटात वाद उफाळून आला.

हे वाचलं का?

रघू कुरडे, ऋत्विक साठे यांच्यासह काही तरुणांनी परिसरात दुचाकीवरून फिरून शस्त्रांचा धाक दाखवत दहशत निर्माण केली. त्यांच्यासोबत माने आणि कुरडे गटातील 10 ते 12 तरुणांनी थेट पृथ्वी आवळे याच्यावर घरावर हल्ला केला. तसंच पृथ्वीवर धारदार शस्त्राने वारही केले.

ADVERTISEMENT

साताऱ्यातील कॉलेज तरुणींची तुफान हाणामारी, व्हीडिओ व्हायरल

ADVERTISEMENT

यामध्ये तो गंभीर जखमी झाला. तसेच त्याची आई रूपाली आवळे या देखील जखमी झाल्या आहेत. या हाणामारीत माने-कुरडे गटातील सुजल कांबळे आणि डीपीआय पक्षाचा जिल्हाध्यक्ष दादा माने हा देखील जखमी झाला आहे. त्यांच्यावर सीपीआरमध्ये उपचार सूरु आहेत. तर उपचारादरम्यान पृथ्वी आवळे याची प्रकृती गंभीर असल्याचं डॉक्टरांनी म्हटलं आहे. सध्या त्याला खाजगी रुग्णालयात हलवण्यात आलं आहे.

दरम्यान, या संपूर्ण घटनेनं वारे वसाहत परिसरात प्रचंड तणाव निर्माण झाला आहे. याप्रकरणी पोलिसात गुन्हा दाखल झाला असून जुना राजवाडा पोलीस आता हल्लेखोरांचा कसून शोध घेत आहेत.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT