Jaya Bachchan : जेव्हा बलात्काराच्या सीनवरून जया बच्चन थेट दिग्दर्शकाला भिडल्या, खलनायकाला तर…

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

Bollywood : Jaya Bachchan : चित्रपटसृष्टीपासून ते राजकारणापर्यंत आपली कारकीर्द गाजवणाऱ्या अभिनेत्री जया बच्चन यांनी 9 एप्रिल रोजी 75 वा वाढदिवस साजरा केला. त्यांनी शोले, गुड्डी, सिलसिला, मिली सारख्या अनेक सुपरहिट चित्रपटांमध्ये काम केले. तसंच त्या राज्यसभेवर खासदार म्हणून जबाबदारी पार पाडत आहेत. आज जया बच्चन यांना खंबीर आणि स्पष्ट व्यक्तिमत्व म्हणून पाहिले जाते. पण तुम्हाला माहित आहे का की हे गुण त्यांच्यात पूर्वीपासूनच आहेत. असाच एक किस्सा आहे त्याबाबत सविस्तर जाणून घेऊयात. (In past film Jaya Bachchan confronted the director directly over the rape scene and hit the villain)

गोव्यात डेस्टिनेशन वेडिंग, 25 लाख हुंडा… विमानतळावर पोहोचताच नवऱ्याने काढला पळ

एका बलात्काराच्या सीनवरून जया बच्चन थेट दिग्दर्शकाला भिडल्या!

80 च्या दशकात जया बच्चन त्यांच्या अभिनयासह अदाकारीसाठी ओळखल्या जात असे. परंतु, पडद्यावर शरीर प्रदर्शन करणे त्यांना चुकीचे वाटायचे. अशात, ‘एक नजर’ या चित्रपटाची शुटिंग सुरू असताना दिग्दर्शकाने एका बलात्काराच्या सीनविषयी त्यांना सांगितले. यामध्ये त्यांचे कपडे फाडले जाणार होते. तेव्हा जया यांनी या सीनला साफ नकार दिला. हा किस्सा जया बच्चन यांनी एका मुलाखतीत सांगितला आहे.

जया बच्चन यांनी पुढे सांगितले की, ‘मला सांगण्यात आलं होतं की माझे कपडे फाटतील, पण मी नाही म्हणाले. मी असे होऊ देणार नाही. माझ्यात आणि बाबू दा म्हणजे दिग्दर्शक बी. आर यांच्यात यावरून मोठा वाद झाला. त्यांनी मला चित्रपट बंद करण्याची धमकी दिली होती. मी देखील ठीक आहे असे म्हणाली. यावर ते म्हणाले होते मी आर्टिस्ट एसोसिएशनकडे जाईन. मी म्हणाले, तुम्हाला जे वाटेल ते करा पण मी हे करणार नाही. तसंच जर मला या चित्रपटात कोणता सीन करण्यासाठी जबरदस्ती केली तर मी तुम्हाला सोडणार नाही. मी यात असे काम करेन की, यामुळे हा चित्रपट फ्लॉप होईल.’ अशीही त्यांनी धमकी दिली होती. यानंतर दोन दिवस शुटिंग बंद होती. जया बच्चन यावरून दिग्दर्शकाला थेट भिडल्या होत्या.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

विरोधकांच्या एकजुटीच्या ठिकऱ्या? ‘हे’ प्रश्न होताहेत उपस्थित; G 8 चं काय?

अमिताभ बच्चन यांनीही जया यांना समजावण्याचा केला होता प्रयत्न!

जया सर्वांशी भांडल्या पण आपल्या निर्णयावर ठाम राहिल्या. या सर्व प्रकारानंतर अमिताभ बच्चन यांनी मध्यस्थी केली. जया यांनी सांगितले होते की, ‘अमितजींनी मला समजावलं की तू इथे काम करायला आली आहेस. जर ही तुझी भूमिका असेल आणि ती अशा प्रकारे लिहिलेली असेल तर तुला ती करावी लागेल. तू नाकारू शकत नाही. त्यावेळी मी म्हणाले, मी माझे कपडे फाटू देणार नाही. मी माझं अंग प्रदर्शन होऊ देणार नाही.’

Eknath Shinde in Ayodhya Live : “यांना ऑपरेशनची गरज नाही, गोळ्याच पुरेशा”

नेमकं काय घडलं? जेव्हा जया यांनी खलनायकाला धुतलं…

जया आणि दिग्दर्शक बी.आर यांच्यात यानंतर बोलणं झालं. यानंतर बाबू दा म्हणाले, आपण हे साध्या पद्धतीने शूट करूयात. तू फक्त तसा अभिनय कर मग पुढे आपण बघू. पण बिचाऱ्या खलनायकाची भूमिका करणाऱ्याला जया यांनी चांगलंच धुतलं. सीन दरम्यान त्याने इतका मारला की तो म्हणाला, ‘मला बलात्कार नाही करायचा. जया बच्चन म्हणतात, ‘मी नेहमीच अंग प्रदर्शनाच्या विरोधात आहे. मला हे पटत नाही. यामागे मी मध्यमवर्गीय कुटुंबातून आल्यामुळे किंवा इतर काही कारण आहे हे मला ठाऊक नाही.’

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT