पुण्यात व्याजाचे पैसे न दिल्याने एका व्यक्तीचा सपासप वार करून खून
मूळ रकमेवरील एक महिन्याचं व्याज न दिल्याने पुण्यातील नवले ब्रिजजवळ 43 वर्षीय व्यक्तीचा धारदार शस्त्राने दोघांनी खून केल्याची घटना घडली आहे.या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. शरद शिवाजी आवारे (वय 43 रा.धनकवडी) असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे.तर प्रकाश शिंदे आणि त्याचा एक साथीदार अशी आरोपींची नावे आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शरद आवारे याने प्रकाश […]
ADVERTISEMENT
मूळ रकमेवरील एक महिन्याचं व्याज न दिल्याने पुण्यातील नवले ब्रिजजवळ 43 वर्षीय व्यक्तीचा धारदार शस्त्राने दोघांनी खून केल्याची घटना घडली आहे.या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. शरद शिवाजी आवारे (वय 43 रा.धनकवडी) असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे.तर प्रकाश शिंदे आणि त्याचा एक साथीदार अशी आरोपींची नावे आहेत.
ADVERTISEMENT
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शरद आवारे याने प्रकाश शिंदे यांच्याकडून 1 लाख रुपये 10 टक्के व्याजाने घेतले होते. मात्र शरद आवारे याने नोव्हेंबर महिन्याचं व्याज प्रकाश याला दिले नव्हते. त्यामुळे काल रात्री आरोपी प्रकाश शिंदे आणि शरद आवारे हे दोघे नवले ब्रिज येथील सर्व्हिस रोडवर भेटले.त्यावेळी दोघांमध्ये वाद झाला.त्यामध्ये आरोपी प्रकाश आणि त्याच्या साथीदाराने शरद आवारे धारदार शस्त्रने सपासप वार केले.
यानंतर शरद रक्ताच्या थारोळ्यात पडून राहिला. घटनास्थळावरून आरोपी पसार झाले आहे.तर जखमी शरद याला जवळील रूग्णालयात दाखल केले केले असता,डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. तसेच आरोपीचा शोध घेतला जात असल्याचे,भारती विद्यापीठ पोलिसानी सांगितले.
हे वाचलं का?
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT