Pune Murder: कामावरून घरी जाताना PMPML चालकाच्या डोक्यात दगड घालून निर्घृण हत्या

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

पुणे: पुण्यातील (PUNE) स्वारगेट डेपोतील पीएमपीएमएल (PMPML) चालक कामावरून घरी जात असताना रस्त्यामध्ये अडवून त्याच्या दगड घालून हत्या (Murder) केल्याची अत्यंत खळबळजनक घटना घडली आहे. यामुळे पुण्यात एकच घबराट पसरली आहे.

गौतम मच्छिंद्र साळुंखे (वय 29) हा मूळचा फुरसुंगी येथे राहणार होता. मागील काही वर्षापासून तो पीएमपीएमएलमध्ये चालक म्हणून काम करत होता.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गौतम मच्छिंद्र साळुंखे हा पीएमपीएमएलमध्ये चालक म्हणून जवळपास अडीच वर्षापासून काम करत होते. गौतम याची स्वारगेट डेपोत ड्युटी असल्याने स्वारगेट ते धायरी या मार्गावर काम करीत होता.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

नेहमीप्रमाणे गौतम साळुंखे हा दुपारी कामावर आला आणि रात्री पावणे दहा वाजेच्या सुमारास काम झाल्यावर घरी निघून गेला. सकाळ झाली तरी गौतम घरी न आल्याने त्याच्या सासऱ्याने स्वारगेट डेपोत जाऊन चौकशी केली. त्यावर तो काम संपवून, रात्रीच घरी गेल्याचे सांगण्यात आले.

त्यानंतर घरच्यांनी त्याचा शोध घेण्यास सुरुवात केली. त्याच दरम्यान पोलिसांना नियंत्रण कक्षावर अशी माहिती मिळाली की, हांडेवाडी येथील एका मोकळ्या जागेत एक मृतदेह आढळून आला आहे.

ADVERTISEMENT

अशी माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. दरम्यान, घटनास्थळी पोहचताच पोलिसांना देखील धक्का बसला. कारण तिथे सापडलेल्या मृतदेहाच्या चेहऱ्याचा पार चेंदामेंदा करण्यात आला होता. त्यामुळे नेमकी व्यक्ती कोण हे पोलिसांना ओळखू येत नव्हतं.

ADVERTISEMENT

दुसरीकडे मृतदेहाच्या बाजूलाच एक दगड पडला होता. त्यावरुन दगड घालून सबंधित व्यक्तीची हत्या करण्यात आल्याचं उघड झालं. त्यानंतर मृतदेहावरील कपडे आणि कागदपत्रांच्या सहाय्याने तो मृतदेह गौतम साळुंखे याचा असल्याचे स्पष्ट झाले.

दरम्यान, गौतम साळुंख सारख्या एका बस चालकाची नेमकी हत्या का करण्यात आली असावी याचं कारण अद्यापही समजू शकलेलं नाही. तसंच त्याच्या हत्येमागे कोणाचा हात असू शकतो याचाही अंदाज आलेला नाही. त्यामुळे आता ही हत्या का आणि कोणी केली हे शोधून काढण्याचं आव्हान पुणे पोलिसांसमोर असणार आहे. मात्र, ज्या निर्घृणपणे ही हत्या करण्यात आली आहे ते पाहता या प्रकरणी काही तरी गंभीर कारण असण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

Pune Crime: पत्नीला फसवून नेलं बाहेर, चारित्र्याच्या संशयातून पतीने केली गळा चिरून हत्या

या संपूर्ण प्रकरणाचा तपास आता पोलिसांनी सुरू केला असल्याची माहिती लोणी काळभोर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ निरीक्षक राजेंद्र मोकाशी यांनी दिली आहे.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT