पुणे-पिंपरी चिंचवडमध्ये कोरोना रूग्णसंख्या वाढल्याने बेड मिळवण्यासाठी वणवण
पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये कोरोना रूग्णांची संख्या वाढू लागली आहे. त्यामुळे ज्या रूग्णांना बेड मिळत नाहीत अशा रूग्णांना दुसरा पर्याय शोधण्यासाठी बाहेर जावं लागतं आहे. पुण्यातून पिंपरी चिंचवड किंवा दुसऱ्या कुठल्या भागात व्हेंटिलेटर्स बेड मिळवण्यासाठी रूग्णांना जावं लागतं आहे अशी स्थित आहे. महाराष्ट्रात कोरोना रूग्णांची संख्या झपाट्याने वाढते आहे त्यामुळे बेड अपुरे पडू लागले आहेत. […]
ADVERTISEMENT

पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये कोरोना रूग्णांची संख्या वाढू लागली आहे. त्यामुळे ज्या रूग्णांना बेड मिळत नाहीत अशा रूग्णांना दुसरा पर्याय शोधण्यासाठी बाहेर जावं लागतं आहे. पुण्यातून पिंपरी चिंचवड किंवा दुसऱ्या कुठल्या भागात व्हेंटिलेटर्स बेड मिळवण्यासाठी रूग्णांना जावं लागतं आहे अशी स्थित आहे. महाराष्ट्रात कोरोना रूग्णांची संख्या झपाट्याने वाढते आहे त्यामुळे बेड अपुरे पडू लागले आहेत.

पुण्यातील संजीवन हॉस्पिटलचे संचालक मुकुंद पेलुलकर यांनी काय म्हटलं आहे?
पुण्यात बेड्सची उपलब्धता खूप कमी आहे. खासकरून व्हेंटिलेटर बेड कमी पडत आहेत. त्यामुळे रूग्णांना पुण्याबाहेर जावं लागतं आहे अशी स्थिती आहे. लोकांना खूप अंतर कापून पिंपरी किंवा इतर भागांमध्ये जावं लागतं आहे. त्यामुळे मी सगळ्या पुणेकरांना आवाहन करतो आहे की मास्क वापरा, सोशल डिस्टन्सिंग पाळा, कोरोना प्रतिबंधाचे नियम पाळा. लोकांनी नियम पाळले नाहीत तर आरोग्यव्यवस्था आणखी अपुरी पडू शकते असंही डॉक्टरांनी म्हटलं आहे. बाहेर काम नसेल तर घरातून बाहेर पडू नका. पहिली लाट आली तेव्हा जशी काळजी घेतली होती तशीच काळजी आत्ताही घेणं गरजेचं आहे. अतिगंभीर रूग्णांसाठी जे व्हेंटिलेटर बेड लागतात ते पुरेसे नाहीत. काही प्रमाणात लोकांना यासाठी वणवण करावी लागते आहे.










