साताऱ्यात एकाच रात्री २१ घरांची घरफोडी करून लाखोंचा ऐवज आणि पैसे लंपास

मुंबई तक

इम्तियाज मुजावर, प्रतिनिधी सातारा सातारा जिल्ह्यातील जावळी तालुक्यातील गुरूवारी रात्री एकाच वेळी 21 बंद घराच्या घरफोडी करून रोख रक्कम सोने आदी साहित्य लंपास केला असल्याची खळबळजनक घटना घडली आहे. ही घटना जावळी तालुक्यातील करंजे, सावली, आसणी, भोगवली, पुनवडी, केडंबे, वाळंजवाडी आणि वरोशी या पाच गावातील एकूण २१ बंद घरं फोडून झाल्याचं उघडकीस आलं आहे. मध्यरात्री […]

ADVERTISEMENT

mumbaitak
mumbaitak
google news

इम्तियाज मुजावर, प्रतिनिधी सातारा

सातारा जिल्ह्यातील जावळी तालुक्यातील गुरूवारी रात्री एकाच वेळी 21 बंद घराच्या घरफोडी करून रोख रक्कम सोने आदी साहित्य लंपास केला असल्याची खळबळजनक घटना घडली आहे. ही घटना जावळी तालुक्यातील करंजे, सावली, आसणी, भोगवली, पुनवडी, केडंबे, वाळंजवाडी आणि वरोशी या पाच गावातील एकूण २१ बंद घरं फोडून झाल्याचं उघडकीस आलं आहे. मध्यरात्री घरफोडी झाली असून चोर लाखो रुपयांची रोख रक्कम आणि साहित्य घेऊन पसार झाले आहेत. या सर्व प्रकारामुळे जावळी तालुक्यात नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. एका रात्रीत 15 गावातील 21 घर रातोरात फोडून किमती ऐवज रोख रक्कम आणि साहित्य अज्ञात चोरट्यांनी घेऊन गेल्याने तालुक्यातील ही पहिलीच घटना घडल्याने पोलिस यंत्रणेच्या कारभारावर संशय व्यक्त केला जात आहे

दरम्यान हा सर्व प्रकार होत असतानाच जावली तालुक्याचे शिवसेनेचे माजी आमदार सदाशिव सपकाळ यांचे गाव चोरांबे गावांत चोरीचा प्रयत्न फसून गावाच्या सी. सी. टी. व्ही. मध्ये कैद झाले आहेत . आज सकाळी सातच्या दरम्यान याची माहिती मेढा पोलिसांनाच लाकताच सहायक पोलीस निरीक्षक अमोल माने यांनी घटना स्थळी भेटी देवून तपास गतिमान केला आसून श्वान पथक बोलवले आहे .

जावळीत ही एकाच रात्रीत बंद घरांची घरफोडी घडण्याचा प्रकार अनेक वेळा घडला असला तरी एकाच वेळी २१ घरफोड्या होण्याचा मोठी घटना घडली असून पोलिस प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देणे गरजेचा आहे दरम्यान अनेक गावात सीसीटीव्ही यंत्रणा नसल्यामुळे अशा

हे वाचलं का?