Osmanabad: देशात पहिल्यांदा ऑक्सिजन निर्मिती करणाऱ्या धाराशिव साखर कारखान्यावर ‘आयटी’ची धाड
-गणेश जाधव, उस्मानाबाद उस्मानाबाद जिल्ह्यातील चोराखळी येथील धाराशिव शुगर कारखान्यावर आयकर विभागाची धाड पडली असून आज पहाटे पासून आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांची कारवाई सुरु आहे. अभिजीत पाटील चेअरमन असलेल्या कारखान्यावर धाडी पडल्याची प्राथमिक माहिती आहे. अभिजीत पाटील हे पंढरपूर येथील असून ते साखर सम्राट म्हणून गेल्या 10 वर्षात ओळखले जात आहेत. जिल्ह्यात त्यांची कारखानदार म्हणून ओळख […]
ADVERTISEMENT

-गणेश जाधव, उस्मानाबाद
उस्मानाबाद जिल्ह्यातील चोराखळी येथील धाराशिव शुगर कारखान्यावर आयकर विभागाची धाड पडली असून आज पहाटे पासून आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांची कारवाई सुरु आहे. अभिजीत पाटील चेअरमन असलेल्या कारखान्यावर धाडी पडल्याची प्राथमिक माहिती आहे. अभिजीत पाटील हे पंढरपूर येथील असून ते साखर सम्राट म्हणून गेल्या 10 वर्षात ओळखले जात आहेत. जिल्ह्यात त्यांची कारखानदार म्हणून ओळख आहे. अशा त्यांच्या कारखान्यावर ही धाड पडली आहे.
कोण आहेत अभिजित पाटील?
अभिजित पाटील पंढरपूर तालुक्यातील विठ्ठल सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत सत्ताधारी राष्ट्रवादीच्या भालके गटाला धक्का देत 21 पैकी 20 जागा जिंकल्यानंतर ते प्रकाशझोतात आले होते.विठ्ठल सहकारी व धाराशिव कारखाना चेअरमन आहेत.त्यांच्या ताब्यात 5 कारखाने आहेत त्यात विठ्ठल सहकारी साखर कारखाना, सांगोला सहकारी साखर कारखाना, नाशिक व नांदेड येथे एक, धाराशिव असे साखर कारखाने आहेत.
अवैध वाळुप्रकरणात 3 महिने भोगावी लागली होती जेल
वाळू माफिया ते साखर सम्राट असा अभिजीत पाटील यांचा प्रवास आहे. त्यांना तत्कालीन सोलापूर जिल्हाधिकारी तुकाराम मुंडे यांच्या कारवाईनंतर वाळू तस्करी प्रकरणात जवळपास 3 महिने जेलवारी पण झाली होती. त्यानंतर त्यांनी बाहेर आल्यावर ट्रॅक बदलला व साखर कारखानदारी सुरु केली. फक्त धाराशीव कारखानाच नव्हे तर पंढरपूरच्या डिव्हीपी उद्योग समूहाच्या सर्व आस्थापनांवर आयकर विभागाच्या पथकाने धाडी टाकल्याची प्राथमिक माहिती मिळतिये. पहाटे 6 वाजल्यापासून ही कारवाई सुरु आहे.
Dharashiv Sugar Factory : ऑक्सिजन निर्मिती करणारा देशातील पहिला कारखाना
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत ऑक्सिजनचा मोठा तुटवडा निर्माण झाला होता. त्यावेळी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी सर्व साखर कारखान्यांना ऑक्सीजन निर्मिती करण्याचे आवाहन केले होते. त्यादरम्यान वाढत्या ऑक्सीजन तुटवड्यावर मार्ग काढण्यासाठी राज्यात प्रथमच धाराशिव साखर कारखान्याने पुढाकार घेऊन ऑक्सीजन निर्मितीचा राज्यातील पहिला पायलट प्रकल्प कार्यान्वित केला होता. त्यावेळी हा कारखाना मोठ्या चर्चेत आला होता. आता त्याच धाराशिव कारखान्यावर आयकर विभागाची कारवाई झाल्याने नेमकी भानगड काय? असा प्रश्न येथील नारिकांना पडला आहे.