Narendra Modi: जागतिक लोकप्रिय नेत्यांच्या यादीत नरेंद्र मोदी सलग तिसऱ्यांदा नंबर वन!
जागतिक लोकप्रिय नेत्यांच्या यादीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सलग तिसऱ्यांदा पहिलं स्थान मिळवलं आहे. अमेरिेकेतील डेटा इंटेलिन्स कंपनी मॉर्निंग कन्सल्टच्या सर्व्हेनुसार ७५ टक्के रेटिंगसह भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे जागतिक नेत्यांच्या क्रमवारीत नंबर वन झाले आहेत. नरेंद्र मोदींनंतर मेक्सिकोचे अध्यक्ष मॅन्युअल लोपेज आणि ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान अँथनी अॅल्बेनस यांचा क्रमांक लागतो. मॅन्युअल यांना ६३ टक्के रेटिंग […]
ADVERTISEMENT

जागतिक लोकप्रिय नेत्यांच्या यादीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सलग तिसऱ्यांदा पहिलं स्थान मिळवलं आहे. अमेरिेकेतील डेटा इंटेलिन्स कंपनी मॉर्निंग कन्सल्टच्या सर्व्हेनुसार ७५ टक्के रेटिंगसह भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे जागतिक नेत्यांच्या क्रमवारीत नंबर वन झाले आहेत.
नरेंद्र मोदींनंतर मेक्सिकोचे अध्यक्ष मॅन्युअल लोपेज आणि ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान अँथनी अॅल्बेनस यांचा क्रमांक लागतो. मॅन्युअल यांना ६३ टक्के रेटिंग मिळालंय तर अँथनी अॅल्बेनस यांना ५८ टक्के रेटिंग आहे. जगभरातल्या २२ लोकप्रिय नेत्यांचीही यादी आहे. त्यात नरेंद्र मोदी पहिल्या क्रमांकावर आहेत. भारतासाठी ही निश्चितच अभिमानाची बाब आहे.
मॉर्निंग कन्सल्टने जगभरातल्या नेत्यांबाबत केला सर्व्हे
मॉर्निंग कन्सल्ट हा ऑनलाइन प्लॅटफॉर्म आहे. जगभरातल्या निवडणुका, राजकारणी यांच्याबाबत रिअल टाइम माहिती पुरवण्याचं काम या प्लॅटफॉर्मद्वारे होतं. मॉर्निंग कन्सल्टकडून दर आठवड्याला ही माहिती पुरवली जाते. रोज ते सुमारे २० हजार ऑनलाइन मुलाखती घेत असतात.
मॉर्निंग कन्सल्टने जाहीर केलेल्या यादीत कोणती पाच प्रमुख नावं आहेत त्यांचं रेटिंग किती?
१) नरेंद्र मोदी, पंतप्रधान, भारत- ७५ टक्के रेटिंग










