भारतीय खेळाडूंची कॉन्ट्रॅक्ट यादी जाहीर; जडेजा-पंड्याला बढती तर केएलला झटका

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

Indian players’ contract list : भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) 2022-23 हंगामासाठी टीम इंडियाच्या खेळाडूंची वार्षिक करार यादी जाहीर केली आहे. स्टार अष्टपैलू रवींद्र जडेजाला बढती मिळाली असून तो आता A+ ग्रेडमध्ये आला आहे. आणि केएल राहुलची ए ग्रेड वरून बी श्रेणीत टाकण्यात आलं आहे. बीसीसीआयने एकूण 26 खेळाडूंना करार यादीत स्थान दिले आहे. (Indian players’ contract list released; Promotion of Jadeja and Pandya is a blow to KL)

ADVERTISEMENT

shubman gill story: 100 रुपयांच्या पैजेमुळे बनला तडाखेबंद फलंदाज, अशी आहे स्टोरी

दुखापतीचा सामना करत असलेला कर्णधार रोहित शर्मा, माजी कर्णधार विराट कोहली आणि वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह यांनी A+ श्रेणीत आपली जागा कायम ठेवली आहे. आता रवींद्र जडेजाच्या आगमनाने या श्रेणीत समाविष्ट असलेल्या खेळाडूंची संख्या चार झाली आहे. या चार खेळाडूंना ऑक्टोबर 2022 ते सप्टेंबर 2023 पर्यंत 7 कोटी रुपये मिळतील.

हे वाचलं का?

हार्दिक-अक्षरलाही बढती मिळाली

हार्दिक पंड्या, रविचंद्रन अश्विन, मोहम्मद शमी, ऋषभ पंत आणि अक्षर पटेल यांचा ए ग्रेडमध्ये समावेश करण्यात आला आहे. अक्षर पटेल आधी बी ग्रेडमध्ये होता आणि हार्दिक पांड्या सी ग्रेडमध्ये होता, पण आता त्याला बढती देण्यात आली आहे. चेतेश्वर पुजारा, केएल राहुल, श्रेयस अय्यर, मोहम्मद सिराज, सूर्यकुमार यादव आणि शुभमन गिल हे अनुभवी फलंदाज बी ग्रेडमध्ये आहेत. यावेळी शुभमन गिललाही बढती मिळाली आहे.

पाकिस्तान हरला आणि शोएब अख्तर भलताच खुश झाला; काय आहे कारण?

ADVERTISEMENT

बी श्रेणीतील खेळाडूंना ३ कोटी रुपये मिळणार आहेत. उमेश यादव, शिखर धवन, शार्दुल ठाकूर, इशान किशन, दीपक हुडा, युझवेंद्र चहल, कुलदीप यादव, वॉशिंग्टन सुंदर, संजू सॅमसन, अर्शदीप सिंग आणि यष्टीरक्षक फलंदाज केएस भरत हे ग्रेड सी चा भाग आहेत आणि त्यांना 1 कोटी रुपये मिळतील. भारत, इशान किशन आणि अर्शदीप सिंग यांना पहिल्यांदाच कॉन्ट्रॅक्ट लिस्टमध्ये स्थान मिळाले आहे.

ADVERTISEMENT

या खेळाडूंना करार यादीतून वगळण्यात आले

वेगवान गोलंदाज इशांत शर्मा आणि अनुभवी फलंदाज अजिंक्य रहाणे आता कराराच्या यादीत नाहीत. रहाणे आणि इशांत यांना गेल्या मोसमात बी ग्रेड करार देण्यात आला होता. यष्टिरक्षक फलंदाज रिद्धिमान साहा, वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमार, मधल्या फळीतील फलंदाज हनुमा विहारी, सलामीवीर मयंक अग्रवाल आणि अष्टपैलू दीपक चहर यांनाही वगळण्यात आले आहे. तसं पाहिल्यास, यावेळी चार खेळाडूंना A+ श्रेणी, A मध्ये पाच, B श्रेणीमध्ये सहा आणि C श्रेणीमध्ये सर्वाधिक 11 खेळाडूंना स्थान मिळाले आहे.

भारत-पाकिस्तान कधी आणि कुठे खेळणार? पहा वर्षभराचं वेळापत्रक

सेंट्रल करारातील खेळाडू (ऑक्टोबर 2022 ते सप्टेंबर 2023 पर्यंत):

ग्रेड A+ (वार्षिक ७ कोटी): विराट कोहली, रोहित शर्मा, जसप्रीत बुमराह, रवींद्र जडेजा. ग्

रेड A (5 कोटी रुपये प्रतिवर्ष): हार्दिक पांड्या, मोहम्मद शमी, ऋषभ पंत, रविचंद्रन अश्विन, अक्षर पटेल.

ग्रेड B (रु. ३ कोटी वार्षिक): चेतेश्वर पुजारा, केएल राहुल, श्रेयस अय्यर, मोहम्मद सिराज, सूर्यकुमार यादव, शुभमन गिल.

ग्रेड C (रु. 1 कोटी वार्षिक): उमेश यादव, शिखर धवन, शार्दुल ठाकूर, इशान किशन, दीपक हुडा, युझवेंद्र चहल, कुलदीप यादव, वॉशिंग्टन सुंदर, संजू सॅमसन, अर्शदीप सिंग, केएस भरत.

India vs Pakistan : “मोदी साहेबांना माझी विनंती…;” शाहिद आफ्रिदीचं मोठं विधान

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT